मक्याच्या हिरव्या चाऱ्याची कुटी साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:04 AM2021-09-14T04:04:32+5:302021-09-14T04:04:32+5:30
तालुक्यातील आळंद, उमरावती, जातवा, नायगव्हाण परिसरातील अनेक गावात सहकारी व खासगी दूध संकलन संस्था आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून लोक ...
तालुक्यातील आळंद, उमरावती, जातवा, नायगव्हाण परिसरातील अनेक गावात सहकारी व खासगी दूध संकलन संस्था आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून लोक पशुपालन करतात. शेणखत मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे आहेत. या दुधाळ जनावरांना दूधवाढीसाठी ऊस व इतर हिरव्या चाऱ्याची गरज असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. उसाचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यामुळे उसाला पर्याय म्हणून शेतकरी मकाच्या हिरव्या चाऱ्याची कुटी (मुरघास) करण्यात पसंदी देतात. हवाबंद पन्नी व बैग (भोद) साठवण करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
---
माझ्याकडे कुटी मशीन असून, त्यावर पंधरा लोक काम करतात. एका ट्रॅक्टरची तीन हजार रुपये ट्रिप प्रमाणे कुटी करण्यात येत आहे. त्यात प्रत्येक ट्रिपमागे सोंगणी व कुटी करून ती साठवण करण्यासाठी मजुरांना १७०० रुपये, वाहतुकीसाठी ४०० रुपये मिळतात. अर्थात कुटी मशीनमुळे रोजगार मिळाला आहे. - अंकुश खिल्लारे, कुटी मशीन मालक
माझ्याकडे दुधाळ गायी व अन्य दहा ते बारा जनावरे आहे. त्यांना हिरवा चारा मोठ्या प्रमाणावर लागतो. मात्र, पाऊस गेल्या काही वर्षांपासून कमी प्रमाणात असल्याने ऊस लागवड करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक एकर मकाच्या हिरव्या चाऱ्याची कुटी करून त्याची साठवणूक करतो. - शिवाजी चोपडे, शेतकरी, आळंद
130921\20210913_165719.jpg~130921\img-20210913-wa0143.jpg
फोटो-आळंद(ता.फुलंब्री)येथे मकाच्या हिरव्या चार्याची सुरु असलेली कुटी(02)शेतकरी यांनी साठवण केलेली कुटी.~फोटो-आळंद(ता.फुलंब्री)येथे मकाच्या हिरव्या चार्याची सुरु असलेली कुटी(02)शेतकरी यांनी साठवण केलेली कुटी.