शेतकऱ्यांनो पाण्याच्या मोटारला कपॅसिटर बसवा अन् ३० टक्के वीज वाचवा !

By साहेबराव हिवराळे | Published: December 21, 2023 03:32 PM2023-12-21T15:32:05+5:302023-12-21T15:35:01+5:30

विद्युत नियमांकानुसारच कपॅसिटर बसविणे गरजेचे आहे.

Farmers install capacitors to water motors and save 30 percent of electricity! | शेतकऱ्यांनो पाण्याच्या मोटारला कपॅसिटर बसवा अन् ३० टक्के वीज वाचवा !

शेतकऱ्यांनो पाण्याच्या मोटारला कपॅसिटर बसवा अन् ३० टक्के वीज वाचवा !

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात वारंवार वीज जाते. त्यामुळे शेतकरी शेतातील पाण्याच्या मोटारला ऑटो स्वीच बसवतात. त्यामुळे मोटार आणि रोहित्र जळण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी कपॅसिटर बसविल्यास ३० टक्के वीजबचतदेखील होते. परंतु खेड्यात मीटरटेरिफ अन् टेरिफ असा प्रकार असल्याने त्यातील जेव्हा वीजबिल येते तेव्हा त्यातील फरक लक्षात येतो. परंतु लो व्होल्टेज आणि काही तांत्रिक बाब निर्माण झाल्यास वीज सोडल्याने मोटर जळण्याचा धोका टाळला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची बचतच होते.

‘ऑटो स्विच’चे धोके काय?
अनेकदा शेतात जाण्याचे टाळले जाते आणि वीजपुरवठा आला की ऑटो स्विचचा वापर करून मोटारी सुरू केल्या जातात,त्यात काही गोंधळ झाल्यास अपघाताने मोटारीला धोका होण्याची भीती कायम असते. हेदेखील शेतकऱ्यांना वाटला तेव्हा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित्र जळण्याच्या घटना वाढल्या
कमी दाबाची वीज आणि त्यावर जास्तीचे आकडे वापरल्याने व फ्युज बॉक्स खराब होणे किंवा क्षमतेपेक्षा दाब वाढ होऊन त्याचा परिणाम विहिरीवरील मोटारीवर होतोच अनेकदा तांत्रिक बिघाडाने रोहित्र खराब होण्याची दाट धोका होतो. वीजपुरवठा किरकोळ बिघाड झाला तर दुरुस्ती त्वरित होते. परंतु रोहित्र जळाले तर त्याच्या दुरुस्तीला विलंब लागतो.

रिडिंगनुसर इम्प्रुव्हमेंट
विद्युत नियमांकानुसारच कपॅसिटर बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे विजेचीही बचत होते आणि विहिरीवरील मोटारीचे नुकसान टाळले जाते. मीटरवर आलेल्या रीडिंगनुसार तुम्ही किती वापरलेल्या मोटारीने किती चांगला इम्प्रुव्हमेंट केलेले आहे. हे यावरून निदर्शनात येते. निश्चितच ३० टक्के वीज वाचविली जाते.

ऑटो स्विच काढा नाही तर कारवाई
ऑटो स्विच मोटारीला बसवू नये त्यामुळे अपघाताचा तसेच तुमचे आर्थिक नुकसानही होण्याचे प्रकार वाढतात, त्यात बिघाडाने रोहित्र उडून मोठे नुकसान महावितरणला सहन करावे लागते. ते मोटारीला कुणी लावल्यास त्यांच्यावर महावितरण विभाग कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विजेचा योग्य वापर करावा, बिल भरावे..
वीजबिलाची वसुलीकडेदेखील अधिक लक्ष देऊन वीज गळती रोखावी, इतरांना आपल्यामुळे अडचणीला सामोरे जावू नये, याची दक्षता घ्यावी.
- महावितरण अधिकारी

Web Title: Farmers install capacitors to water motors and save 30 percent of electricity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.