शेतकºयांची थट्टा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:46 AM2017-08-03T00:46:06+5:302017-08-03T00:46:06+5:30

पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलैची मुदत संपल्यानंतर शासनाने मंगळवारी सायंकाळी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश बँकांना पाठविले़, परंतु रात्री उशिरा पीक विम्यासंदर्भात आणखी एक आदेश धडकला़ त्यामध्ये बिगर कर्जदार शेतकºयांना सेतू केंद्रात पीक विमा काढण्याचे नमूद होते़ त्यामुळे बुधवारीही बँकांनी पीक विमा स्वीकारला नसून बँक आणि सेतूच्या फेºयात अडकलेल्या शेतकºयांची अशाप्रकारे शासनाकडून थट्टाच सुरु आहे़

Farmers' jokes start | शेतकºयांची थट्टा सुरुच

शेतकºयांची थट्टा सुरुच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलैची मुदत संपल्यानंतर शासनाने मंगळवारी सायंकाळी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश बँकांना पाठविले़, परंतु रात्री उशिरा पीक विम्यासंदर्भात आणखी एक आदेश धडकला़ त्यामध्ये बिगर कर्जदार शेतकºयांना सेतू केंद्रात पीक विमा काढण्याचे नमूद होते़ त्यामुळे बुधवारीही बँकांनी पीक विमा स्वीकारला नसून बँक आणि सेतूच्या फेºयात अडकलेल्या शेतकºयांची अशाप्रकारे शासनाकडून थट्टाच सुरु आहे़
३१ जुलै ही पीक विमा स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्यामुळे जिल्ह्यातील सेतू केंद्र आणि बँकांबाहेर हजारो शेतकºयांनी उन्हातान्हात रांगेत लागून पीक विमा भरला़ अनेक तालुक्यांतील शेतकºयांना तर पीक विम्यासाठी जागरण करावे लागले़ नागपंचमी सणाच्या दिवशीही शेतकरी दिवसभर बँकांच्याच रांगेत होते़ ३१ जुलैच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यात जवळपास चार लाख शेतकºयांनी पीक विमा भरला होता़ मुदत संपल्यामुळे तब्बल ३ लाख ७० हजारांवर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यात ३१ जुलैच्या रात्री शासनाने पीक विम्यासाठी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ त्यामुळे अनेक शेतकºयांचा जीव भांड्यात पडला होता़ शासनाच्या घोषणेनुसार १ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात बँकांमध्ये पीक विमा काढण्यासाठी शेतकरी गेले, परंतु सायंकाळपर्यंत मुदतवाढीचे आदेशच बँकांना मिळाले नव्हते़ त्यामुळे काही ठिकाणी बँकेचे अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादाच्या घटना घडल्या़
सायंकाळी बँका बंद झाल्यानंतर मुदतवाढीचे आदेश धडकले़ त्यामुळे मुदतवाढीच्या पहिल्या दिवशी एकाही शेतकºयाचा पीक विमा उतरविण्यात आला नाही़ सायंकाळी आलेल्या आदेशानंतर बँकांनी बुधवारपासून पीक विमा काढण्याचे नियोजन केले होते, परंतु रात्री उशिरा आणखी एक नवाच आदेश धडकला़ त्यामध्ये ही मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकºयांसाठीच देण्यात आली असून आॅनलाईन पद्धतीत जनसुविधा केंद्राच्या माध्यमातूनच भरण्यात येतील़
शेतकºयाकडील पीक पेरणी प्रमाणपत्र ३१ जुलै २०१७ अथवा त्यापूर्वीचा असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले़ तसेच वाढीव मुदतीत भरलेल्या अर्जाची माहिती स्वतंत्रपणे ठेवण्यास सांगण्यात आले आहे़ तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशात ५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती़ नव्या आदेशात मात्र ती ४ आॅगस्टपर्यंतच दाखविण्यात आली आहे़ त्यामुळे पहिला दिवस निरंक, दुसरा दिवस गोंधळात गेल्यानंतर आता साडेतीन लाखांवर शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत़

Web Title: Farmers' jokes start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.