केळगाव परिसरातील शेतकरी बोंडअळीने हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:22 AM2020-12-11T04:22:01+5:302020-12-11T04:22:01+5:30
केळगाव : कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन खर्चही शेतकरी बांधवांना झेपेनासा झाला आहे. अखेर अनेक ...
केळगाव : कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन खर्चही शेतकरी बांधवांना झेपेनासा झाला आहे. अखेर अनेक शेतकरी कपाशी मोडून तिला जाळून टाकीत आहेत. या विदारक परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
रवर्षीप्रमाणे यंदाही कपाशीवर बोंडअळीचे संकट उभे राहिले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांच्या हाती केवळ चाळीस टक्के कापूस पडला आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकर्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे, सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील गणेश ईवरे यांनी तीन एकरातील कपाशी पिक चिमट्याच्या सहाय्याने मोडून टाकले. आजवर योग्य व्यवस्थापन करीत त्यांनी पीक जोपासले कपाशीवर चार ते पाच वेळा फवारणी केली प्रत्येक कपाशीच्या बोंडात अळी असल्याने उत्पादन येण्याची चिन्हे दिसून आली. कापूस वेचणीला खर्चही वाढलेला आहे. उत्पादन अत्यंत कमी दिसत असल्याने चिमट्याच्या व ट्रक्टर चालवत आहेत पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.
पाहणी करून मदत करावी
सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने कापसाला चांगलाच फटका बसला आहे. तरीही कापसाकडून चांगल्या उत्पादनाची आस लागलेल्या शेतकर्यांना बोंडअळीमुळे निराशा पसरली आहे. ओलीत क्षेत्रात एकरी दहा ते बारा क्विंटल कापूस पिकत असे. तिथे केवळ तीन ते चार क्विंटल कापूस शेतकर्यांच्या हाती लागला. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणे कठीण झाला आहे. काही ठिकाणी शेतात कापसाचे पीक अद्यापही आहेत, मात्र तिथे बोंडअळीने उद्रेक केला आहे. अखेर निराशाजनक परिस्थिती पाहता शेतकरी कपाशी मोडून त्याला पेटवून देत आहेत. बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पाहणी करून शेतकर्यांना मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.
फोटो - चिमट्याच्या सहाय्याने कपाशी उपटून टाकताना शेतकरी बांधव