लाडसावंगीत युरियासाठी शेतकऱ्यांनी लावली रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:04 AM2021-06-23T04:04:26+5:302021-06-23T04:04:26+5:30

लाडसावंगी परिसरात ८ जूनदरम्यान अल्पशा पावसाने हजेरी लावली होती. त्यावर अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या कपाशीसह इतर पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र ...

Farmers line up for urea in Ladsawangi | लाडसावंगीत युरियासाठी शेतकऱ्यांनी लावली रांग

लाडसावंगीत युरियासाठी शेतकऱ्यांनी लावली रांग

googlenewsNext

लाडसावंगी परिसरात ८ जूनदरम्यान अल्पशा पावसाने हजेरी लावली होती. त्यावर अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या कपाशीसह इतर पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र नंतर पावसाने दडी दिल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे, तर अनेकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. आधीच पावसाची टंचाई असताना लाडसावंगी परिसरात युरिया खताची टंचाई जाणवत आहे. लाडसावंगी परिसराला खत पुरवठा करणाऱ्या सोसायटीमध्ये युरिया येताच सोमवारी शेतकऱ्यांनी सकाळपासून रांग लावली होती. सोमवारी थम मशीन बंद पडल्याने तसेच इंटरनेटच्या समस्येमुळे खत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी पुन्हा रांगा लावून खत घेतले.

कोट

आम्ही शेतकऱ्यांसाठी मुबलक युरिया खरेदी करून ठेवला आहे. मात्र, मागीलवर्षी युरियाची टंचाई जाणवल्याने यंदा टंचाईच्या भीतीने शेतकरी युरियासाठी गर्दी करीत आहेत. सोमवारी थम मशीन व इंटरनेट बंद पडल्याने खत विक्री करता आली नाही. मंगळवारी दिवसभर युरिया विक्री सुरू होती.

- जी. एल. शेजूळ, सचिव, वि. का. सोसायटी, लाडसावंगी.

Web Title: Farmers line up for urea in Ladsawangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.