घायगावात बनावट कांदा बियाण्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:04 AM2021-02-18T04:04:11+5:302021-02-18T04:04:11+5:30

घायगाव येथील शेतकरी संतोष साळुंखे यांनी दोन महिन्यांपूर्वी वैजापूर येथील एका कृषी सेवा केंद्रातून अंकुर वाणाचे ३ किलो उन्हाळी ...

Farmers lose millions of rupees due to fake onion seeds in Ghaigaon | घायगावात बनावट कांदा बियाण्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

घायगावात बनावट कांदा बियाण्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

googlenewsNext

घायगाव येथील शेतकरी संतोष साळुंखे यांनी दोन महिन्यांपूर्वी वैजापूर येथील एका कृषी सेवा केंद्रातून अंकुर वाणाचे ३ किलो उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले. घायगाव शिवारातील गट क्र. १८७ मधील त्यांच्या शेतात त्यांनी या बियाण्याची लागवड केली. यासाठी त्यांना पन्नास हजार रुपये खर्च आला. दीड ते दोन महिन्यानंतर कांद्याची उगवण झाली. मात्र यातील नव्वद टक्के कांदा हा दुभाळका म्हणजे जोडकांदा होता. या कांद्याला बाजारात अतिशय कमी भाव मिळतो. जोडकांदा निघाल्यामुळे शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हे बियाणे बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर साळुंके यांनी कंपनीविरोधात तक्रार देऊन कंपनीवर कारवाई करुन नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तक्रारीनंतर पथकाने पाहणी केली असून अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कृषी अधिकारी कुलकर्णी यांनी दिली.

चौकट

पथकाने केला पंचनामा

शेतकरी साळुंके यांच्या तक्रारीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी, पं.स.चे गुणनियंत्रक संजय मुसने, कृषी अधिकारी एच. आर. बोयनर, वनस्पती रोग शास्त्रज्ञ जी. पी. जगताप, पं.स. सदस्य रविराज कसबे, कंपनीचे अधिकारी हारदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन कांदा पिकाची पाहणी करुन पंचनामा केला.

कोट..

नुकसान भरपाई द्या

बनावट बियाण्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी चौकशी करुन बियाणे कंपनीवर कारवाई करावी व शेतकऱ्याला मोबदला मिळवून द्यावा.

-रविराज कसबे, पंचायत समिती सदस्य.

फोटो कॅप्शन : घायगाव येथील शेतकरी साळुंके यांच्या शेतात कृषी विभागाचे गुण नियंत्रक पथक उगवलेल्या कांद्याची पाहणी करताना.

170221\img-20210217-wa0260_1.jpg

घायगाव येथील शेतकरी साळुंके यांच्या शेतात कृषी विभागाचे गुण नियंत्रक पथक उगवलेल्या कांद्याची पाहणी करताना.

Web Title: Farmers lose millions of rupees due to fake onion seeds in Ghaigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.