मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम आखणार

By Admin | Published: February 16, 2016 11:40 PM2016-02-16T23:40:15+5:302016-02-16T23:43:18+5:30

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, यासाठी आगामी काळात सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील ठरेल

For the farmers of Marathwada, we will have a creative program | मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम आखणार

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम आखणार

googlenewsNext

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, यासाठी आगामी काळात सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील ठरेल, असा उपक्रम हाती घेण्याचा निश्चय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आजी, माजी विद्यार्थ्यांनी केला़
विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा रविवारी पार पडला़ विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले़ अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ़ व्ही़ के़ पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़ व्ही़एम़ मायंदे, वनामकृविचे माजी कुलगुरु डॉ़ के़पी़ गोरे, आ़ डॉ़ राहुल पाटील यांची उपस्थिती होती़ प्रारंभी प्रा़ रामभाऊ घाटगे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला़ या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तेलंगणातील खासदार बी़बी़ पाटील, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी परिवहन आयुक्त श्यामसुंदर शिंदे, मुख्य वन संरक्षक पी़एऩ मुंडे, माजी जिल्हाधिकारी शालीग्राम वानखेडे, फलोत्पादन संचालक एस़एल़ जाधव, मुख्य वनसंरक्षक जी़पी़ गरड, अन्न व औषधी प्रशासनाचे उपायुक्त सुरेश अन्नपुरे, उपायुक्त जितेंद्र पापडकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य रघुनाथराव जाधव, जिल्हा कृषी अधिकारी टी़एस़ मोटे, साहेबराव दिवेकर, गोविंदराव पवार, प्रकाश खंदारे, उद्योजक कालिदास जाधव, अ‍ॅड़ मंडलिक आदींचा सत्कार करण्यात आला़ तसेच यावर्षी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यापीठाचे विद्यार्थी संदीप चव्हाण, सय्यद इम्रान हाश्मी, विकास भुजबळ आदी ४० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमात विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची अस्थायी संघटना स्थापन करण्यात आली़ या संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे सोपविण्यात आली़ तसेच कार्याध्यक्षपदी प्रा़ रामभाऊ घाटगे, सचिवपदी प्रा़ दिलीप मोरे, सहसचिवपदी प्रा़ डॉ़ पी़ आऱ झंवर यांची नियुक्ती झाल्याचे रवींद्र देशमुख यांनी जाहीर केले़ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास देशभरात विविध संस्थांमध्ये उच्चपदावर काम करणारे अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते़
विद्यापीठाचे हे माजी विद्यार्थी स्रेहमेळाव्याच्या निमित्ताने परभणीत एकत्र आले होते़ मराठवाड्यात सद्यस्थितीत दुष्काळी परिस्थिती आहे़ या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच कृतीशील कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले़ माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला़ प्रा़ डॉ़ माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले़ रवींद्र देशमुख यांनी आभार मानले़ मेळाव्यास कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: For the farmers of Marathwada, we will have a creative program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.