जोगेश्वरीत शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:42 PM2019-05-10T21:42:54+5:302019-05-10T21:43:00+5:30
मेळाव्यात कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले.
वाळूज महानगर: जोगेश्वरी येथे शुक्रवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले.
जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकºयांना यंदाच्या पावसाळ्यापुर्वी खरीप हंगामाची पेरणीसाठी बि-बियाणे, औषधी आदींची माहिती व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने येथील मारुती मंदिराच्या प्रांगणात मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.किशोर झाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पा.डोणगावकर, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पा. निळ, माजी सरपंच प्रविण दुबिले, सरपंच सोनू लोहकरे, उपसरपंच मंगलबाई निळ, अमोल लोहकरे उपस्थित होते.
डॉ.किशोर झाडे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला ग्रामपंचायत सदस्य सुर्यभान काजळे, योगेश दळवी, नजीरखॉ पठाण, अनिता सरोदे, सुनिल वाघमारे, छाया बोंबले, सुमन काजळे, कलीम शहा, लक्ष्मीबाई कर्डिले, वनिता नरवडे, कल्याण साबळे, पंडीत पनाड, लक्ष्मीबाई चव्हाण, करुणा सोनकांबळे, भिकन शेळके, पिरोबा काजळे, सुरेश वाघमारे, भास्कर दुबिले, कल्याण दुबिले, अशोक खुने, भाऊसाहेब नरवडे, काकासाहेब शेळके, शांतीलाल काबरा, काशिनाथ भावले, अप्पासाहेब वाघमारे, रायभान नरवडे आदींची उपस्थिती होती.