विजेच्या समस्येवर तोडग्यासाठी पैठण तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 08:35 PM2019-01-25T20:35:02+5:302019-01-25T20:35:29+5:30

शेतातील कृषी पंपाचा वीजपुरवठा आठ तास ऐवजी चार तासच करण्यात आला आहे.

Farmers' morcha at Paithan tehsil for settlement of electricity problem | विजेच्या समस्येवर तोडग्यासाठी पैठण तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा 

विजेच्या समस्येवर तोडग्यासाठी पैठण तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा 

googlenewsNext

पैठण (औरंगाबाद ) : पैठण येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी छावा क्रांतिवीर सेना व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 
 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाचा वीजपुरवठा आठ तास ऐवजी चार तासच करण्यात आला. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून याविरूद्ध पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याने छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार नानासाहेब फोलाने यांना निवेदन देण्यात आले. त्यात नमुद केले की, शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा, दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू करावी, कारखान्याने थकविलेले ऊसाचे बिले तत्काळ जमा करण्यात यावे, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्या अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

यावेळी शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, अविनाश गायकवाड, भगवान सोरमारे, सागर बिराजदार, किशोर देवघरे, मुक्ताराम मोटे, दिलीप मोटे, योगेश बखले, बळीराम बाबर, अनिल मगरे, भीमशक्ती तालुकाध्यक्ष भाऊराव धरम, बबरु कदम, मोहन कणसे, सुरेश कणसे, रावसाहेब बावणे, राकेश वाघे, अविनाश राऊत, सजन भोसले शिवाजी पाटील साबळे, सुनील खोमणे, कृष्णा पाटणकर, दिनेश देवघरे, कृष्णा बावणे, वैजनाथ देवघरे, धनंजय सोनवणे, संजय मस्के, आकाश संत, अमोल बोंबले, प्रतीक सोनवणे, रामेश्वर निर्मळ, राजू ननवरे, बळीराम बाबर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Farmers' morcha at Paithan tehsil for settlement of electricity problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.