शेतकऱ्यांनी केली संकटावर मात

By Admin | Published: December 11, 2014 12:23 AM2014-12-11T00:23:35+5:302014-12-11T00:42:19+5:30

माधव शिंदे, मसलगा यंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार

The farmers overcome the crisis | शेतकऱ्यांनी केली संकटावर मात

शेतकऱ्यांनी केली संकटावर मात

googlenewsNext


माधव शिंदे, मसलगा
यंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार असा निर्धार करीत अत्यल्प पाण्यावर अत्याधुनिक पद्धतीने मलचिंग पेपरवरील मिरची लागवड करुन नैराश्यात जगणाऱ्या शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्नच सुरु केला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांत चर्चा सुरु आहे़
निलंगा तालुक्यातील मसलगा येथील तुळशीदास साळुंके, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर आरेराव, गोविंद जाधव, बापूराव जाधव आदी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी एक एकर याप्रमाणे पाच एकर शेतीवर मिरची लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केली आहे़ जमिनीपासून १ फूट उंचीचे बेड तयार करुन त्यावर प्रथम ठिबक अंथरले़ त्यावर मलचिंग पेपरचे अच्छादन केले़ दीड बाय दीड फुट असे अंतर ठेऊन मिरचीची लागवड केली आहे़ एका एकरसाठी ४ हजार रोपे लागली आहेत़ आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केल्याने उत्पन्न चांगले मिळेल अशी आशा आहे़ अल्प पावसामुळे यंदा हातचे खरीप गेले़ रबीची पेरणी झाली़ परंतु, ती उगवत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ परिणामी, चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ दुष्काळी परिस्थितीत होरपळ होत असल्याने काही शेतकरी आत्महत्येसारख्या मार्गाकडे वळत आहेत़ परंतु, शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा़ शेतातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करुन उत्पादन घ्यावे, असा संदेशच या शेतकऱ्यांनी दिला आहे़ सध्या सगळीकडेच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या या नवीन प्रयोगाने अन्य शेतकऱ्यांनाही उत्साह येणार आहे़ या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक डी़ एल़ कळसे हे मार्गदर्शन करीत आहेत़ ४
माझ्याकडे पाच एकर ऊस आहे़ त्यातील एक एकर ऊस मोडून आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली आहे़ उर्वरित ऊस क्षेत्रही मोडित काढून अल्प पजर्न्यावरची पीके घेणार असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर आरेराव यांनी सांगितले़
४कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन मिळविणे व कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने आपणही मिरचीची लागवड केली असल्याचे शेतकरी बापूराव जाधव यांनी सांगितले़
४माझे शेतशेजारी ज्ञानेश्वर आरेराव यांनी पाणी देऊ केल्याने आपल्याकडे असलेला ऊस मोडित काढून मिरची व टोमॅटो लागवड करीत असल्याचे सचिन आरेराव यांनी सांगितले़
४गेल्या दोन - तीन वर्षांपासून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले असून, यामध्ये कलकत्ता पान, केळी, टोमॅटो, टरबूज आदींचे उत्पन्न घेतल्याचे शेतकरी तुळशीदास साळूंके म्हणाले़

Web Title: The farmers overcome the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.