प्रकल्प प्रेरणातून शेतक-यांना ‘बळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:17 PM2017-11-24T23:17:48+5:302017-11-24T23:18:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१७ मध्ये एकूण ३७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्याचे प्रमाण लक्षात घेता, त्यांना मानसिक बळ देऊन जगण्याच्या प्रेरणेसाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत ‘प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन’ आरोग्य सेवा कार्यक्रम राबविला जात आहे.
मानसिक दडपणाखाली जीवन जगताना आत्महत्येसारखे विचार मनात येतात. अशा व्यक्तीचे वेळीच समुपदेशन व उपचार केल्यास त्यास आत्महत्येपासून दूर करता येते. यासाठी शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प समुपदेशन कार्यक्रम राबविला जात आहे. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत एकूण ३ हजार ५६४ जणांच्या भेटी प्रकल्पाद्वारे घेतल्या. या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले असून त्यांना औषधोपचार दिले. आशा वर्कर व प्रकल्प प्रेरणा यंत्रणेमार्फत सध्या शेतकरी कुटुंबांच्या भेटींचे नियोजन केले जात आहे. परंतु सदर कामे करताना स्वतंत्र वाहनच उपलब्ध नाही. वाहन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. बाह्यसंपर्कातील १ हजार १५७ तसेच १ हजार ९९५ जणांचे संबंधित यंत्रणेमार्फत समुपदेशन करण्यात आले आहे.