संपूर्ण कर्जमाफीसाठी चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:08 AM2017-08-15T00:08:23+5:302017-08-15T00:08:23+5:30
जालना/रामनगर : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
जालना/रामनगर : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जालना तालुक्यातील रामनगर फाट्यावर शेतकरी संघटनेच्यावतीने दुपारी बारा वाजता रास्ता रोको करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात मानेगाव, मोजपुरी, कारला, हातवन, बाजीउम्रद, उटवद, सोमनाथ, हिस्वन, मालीपिंपळगाव, भिलपुरी आदी गावातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी संजय लाखे पाटील यांनी शेतकºयांची भूमिका मांडली. संघटनेचे दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना मागण्यांचे निवेदन दिले.
विरेगावात निषेध
जालना तालुक्यातील चितळी पुतळी येथे जालना -मंठा महामार्गावर रास्तो रोको आंदोलन करू शासनाचा निषेध करण्यात आला.
भोकरदन येथे रास्ता रोको
भोकरदन-जालना रोडवरील बरंजळा फाट्यावर सुकाणू समितीच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी केशव जंजाळ, शिवाजी इंगळे, अविनाश कोलते, अमोल पाटील, पुंजाराम सांबळे, भरत पाटील यांनी मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिले.
वडीगोद्री येथे तासभर मार्ग रोखला
येथे संपूर्ण कर्जमुक्ती व जालना जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तासभर रास्ता रोको केला. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, या कर्जमाफीसाठी अनेक किचकट अटी लावण्यात आल्या आहेत. दहा टक्के शेतकºयांनाही याचा लाभ मिळणार नाही. या वेळी तलाठी एन. एन. पठाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, पांडुरंग गावडे, पंचायत समिती सदस्य बापुराव खटके, बंडू टोपे, बप्पासाहेब काळे, भारत उंडे, राजेंद्र खटके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब कनके, सदाशिव दुफाके यांच्यासह शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मठपिंपळगावातही आंदोलन
पठपिंपळगाव येथे जालना- अंबड मार्गावरील अर्धातास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांना निवेदन दिले. या वेळी सुरेश जिगे, बाबासाहेब जिगे, जना जिगे, मंजित ढिल्पे, नारायन मदनुरे, गणेश काळे, कैलाश जिगे, साकेर पटेल, शालीकराव जिगे, अंकुश जिगे, तेजराव जिगे, गजानन देठे, राजेश्वर जिगे, सतीश ढवळे , गजानन पवार आदींची उपस्थिती होती.