नव्या आदेशाने शेतकरी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:48 AM2017-08-03T00:48:50+5:302017-08-03T00:48:50+5:30
पिकविम्यासाठी शेतकºयांच्या अडचणी संपत असल्याचे दिसत असतानाच बुधवारी दाखल झालेल्या नव्या आदेशाने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे़ बँकांमध्ये सुरळीतपणे पिकविमा स्वीकारला जात असतानाच तो स्वीकारू नये, असे आदेश मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले़ बुधवारी ठिक ठिकाणी रस्त्यावर येवून शेतकºयांनी संताप व्यक्त केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पिकविम्यासाठी शेतकºयांच्या अडचणी संपत असल्याचे दिसत असतानाच बुधवारी दाखल झालेल्या नव्या आदेशाने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे़ बँकांमध्ये सुरळीतपणे पिकविमा स्वीकारला जात असतानाच तो स्वीकारू नये, असे आदेश मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले़ बुधवारी ठिक ठिकाणी रस्त्यावर येवून शेतकºयांनी संताप व्यक्त केला़
जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पिकविम्याचे अर्ज भरण्यासंदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़ अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहिले होते़ असे असताना पिकविम्याला अखेर मुदतवाढ मिळाल्याने शेतकºयांचा जीव भांड्यात पडला़ सोमवारी बँकांमध्ये सुरळीतपणे विमा रक्कम स्वीकारली जात होती; परंतु, बुधवारी दुपारी शासनाचा नवा आदेश येवून धडकला. या आदेशानुसार बँकांना पिकविमा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, हा विमा केवळ ई-महासेवा केंद्रावरच भरावा, असे आदेश दिले़ त्यामुळे बँकांनी चक्क शटर बंद करून आणि नोटीस लावून विमा रक्कम स्वीकारण्यास नकार दिला़ या प्रकारामुळे शेतकºयांत संतापाची लाट पसरली़ अनेक ठिकाणी तर शेतकºयांनी रस्त्यावर येवून आपला संताप व्यक्त केला़ गंगाखेड येथे ३ तास रास्ता रोको आंदोलन झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़
पाथरी, मानवतमध्ये बँकांचा नकार
पाथरी आणि मानवत या दोन्ही तालुक्यात बँकांनी २ आॅगस्टपासून विमा घेण्यास नकार दिला आहे़ त्यामुळे शहरातील महा-ई-सेवा केंद्रांवर शेतकºयांची गर्दी झाल्याचे दिसून आले़ मानवत येथील जिल्हा बँकेत ३१ जुलैपर्यंत ५ हजार ९५९ शेतकºयांनी ६६ लाख १६ हजार ४०९ रुपयांचा विमा भरला आहे़ १ आॅगस्ट रोजी ९० शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यात आले़ पाथरी येथील स्टेट बँकेत ३१ जुलै अखेर १ हजार ५३ शेतकºयांनी विमा भरला़ १ आॅगस्ट रोजी २५ शेतकºयांचा विमा भरणे झाले आहे़
येलदरीत शेतकरी वंचित
तालुक्यातील येलदरी येथे जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र बँक, सेतू सुविधा केंद्रात शेतकºयांनी दहा दिवसांपासून गर्दी केली होती़ बुधवारी बँकेने चक्क शटर ओढून घेतले आणि विमा भरून घेण्यास नकार दिला़ त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा लालफितीच्या फेºयात अडकला आहे़ येथील सेतू सुविधा केंद्रावर फक्त बिगर कर्जदार शेतकºयांचाच पिकविमा भरून घेतला जात आहे़ त्यामुळे कर्जदार शेतकºयांवर संकट कोसळले आहे़
सेलूत शेतकरी संतापले
सेलू येथील पाथरी रोडवरील जिल्हा बँकेच्या शाखेत सकाळी ११़३० च्या सुमारास पीक विमा घेतला जात नसल्याने शेतकºयांनी गोंधळ केला़ त्यानंतर तहसीलदार स्वरुप कंकाळ बँकेत आले़ बँकेच्या अधिकाºयांनी शासनाचा नवीन आदेश दाखविला़ त्यानंतर कंकाळ यांनी शेतकºयांची समजूत काढली़ त्यानंतर शेतकरी निघून गेले़ त्यानंतर शहरातील खाजगी इंटरनेट केंद्रांवर शेतकºयांची गर्दी झाली होती़
पुर्णेत ४ नंतर प्रक्रिया
पूर्णा शहरात बुधवारी सकाळी सर्व्हर बंद असल्याने सायंकाळी ४ वाजेनंतर पीक विमा स्वीकारण्यास प्रारंभ झाला़ केवळ बीगर कर्जदार शेतकºयांचेच अर्ज स्वीकारले गेले़
जिंतूरातही संभ्रम
जिंतूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकºयांचा पिकविमा स्वीकारण्यास नकार दिल्याने शेतकरी संभ्रमात आहेत़ बुधवारी बँक व्यवस्थापनाने विमा स्वीकारणार नसल्याचे लेखी पत्र दिल्याने सुमारे ५०० शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़