किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:26 PM2019-02-12T22:26:57+5:302019-02-12T22:27:12+5:30

अल्पभूधारक शेतकºयांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी वाळूजमहानगर परिसरातील शेतकºयांची धावपळ आहे.

Farmers run for the benefit of Kisan Samman Yojana | किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची धावपळ

किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची धावपळ

googlenewsNext

वाळूज महानगर : अल्पभूधारक शेतकºयांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी वाळूजमहानगर परिसरातील शेतकºयांची धावपळ आहे. या योजनेचे पसिरातील ९५० शेतकºयांनी अर्ज भरले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. तसेच अर्ज भरण्यासाठी तलाठी सज्जावर शेतकºयांची झुंबड उडत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी नुकतीच अल्पभूधारक शेतकºयांसाठी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतंर्गत शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. पाच एकरपर्यंत शेती असलेल्या अल्पभुधारक शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून, फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्याचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची यादी तयार करुन त्यांचे अर्ज भरुन घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्यात आले आहेत.

त्यामुळे वाळूजमहानगर परिसरातील रांजणगाव, वाळूज, वडगाव आदी तलाठी सज्जात पात्र शेतकºयांची माहिती संकलित करण्यात काम मंडळ अधिकाºयांच्या देखरेखीत तलाठ्यांनी सुरु केले आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंबाची माहिती गोळा करुन कुणाच्या नावावर किती क्षेत्र आहे, याची वर्गवारी केली जात आहे. पाच एकरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असून निर्धारित मुदतीत शेतकºयांचे अर्ज भरुन घेण्यासाठी गावातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक, कोतवाल आदींची मदत घेण्यात येत आहे.

Web Title: Farmers run for the benefit of Kisan Samman Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.