पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:05 AM2021-07-11T04:05:06+5:302021-07-11T04:05:06+5:30
सोयगाव : खरीप हंगामाच्या पीकविम्यासाठी अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी धावपळ सुरू झाली ...
सोयगाव : खरीप हंगामाच्या पीकविम्यासाठी अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. महसूलकडून कोणतीही मदत केल्या जात नसल्याने, शेतकऱ्यांना स्वत: महागडे उतारे काढून पीकविमा भरावा लागत आहे.
खरिपाच्या पीकविम्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नसल्याचे जाहीर केल्याने सोयगाव तालुक्यात पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी सोयगाव शहरात दिसून येत आहे. महसूल आणि कृषी यंत्रणा कोणतीही मार्गदर्शन करत नसल्याने खरिपाचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनाच धावपळ करावी लागत आहे. तलाठी आणि कृषी सहायक गावात फिरकतही नसून, जनजागृती नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यातच सर्वर डाऊन आणि इंटरनेट सुविधा ठप्प होत असल्याने, शेतकऱ्यांना इंटरनेट तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. सोयगाव तालुक्यात खरिपाच्या चाळीस हजार हेक्टरपैकी शनिवारी घेतलेल्या आढाव्यानुसार केवळ ८ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.