शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:06 AM2021-01-13T04:06:01+5:302021-01-13T04:06:01+5:30
एन-२ येथील ग्रामविकास संस्थेतर्फे शाश्वत ग्रामविकास अभियानअंतर्गत कार्यक्षम व उत्पादन सिंचन व्यवस्थापन या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी डॉ.सूर्यकांत ...
एन-२ येथील ग्रामविकास संस्थेतर्फे शाश्वत ग्रामविकास अभियानअंतर्गत कार्यक्षम व उत्पादन सिंचन व्यवस्थापन या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी डॉ.सूर्यकांत पवार, संस्थेचे नरहरी शिवपुरे, मनोहर सरोदे यांची उपस्थिती होती. डॉ. कापसे म्हणाले, मराठवाड्यासाठी सिंचन व्यवस्थापन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविणे व वितरण व्यवस्था सक्षम केल्यास सिंचनक्षेत्रात वाढ होऊन विभागात आर्थिक स्थैर्य येईल. डॉ.पवार यांनी यापुढे काटेकोर सिंचन व्यवस्थापनाची गरज व्यक्त केली. तर प्रास्ताविकात शिवपुरे यांनी सिंचन वाढ झाल्यास मराठवाड्यातून होणारे स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेबिनारमध्ये विभागातील शेतकरी, जलमित्र, अभ्यासक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन माधव संगमे यांनी तर बालाजी बिराजदार यांनी आभार मानले. रवी सातदिवे, निवृत्ती घोडके, रुपाली शिवपुरे यांनी वेबिनारसाठी परिश्रम घेतले.