देऊळगावराजा येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2017 11:34 PM2017-03-25T23:34:09+5:302017-03-25T23:37:02+5:30
देऊळगाव राजा : नाफेडतर्फे तूर खरेदीस विलंब होत असल्याने शेतकरी हैराण आहेत.
देऊळगाव राजा : नाफेडतर्फे तूर खरेदीस विलंब होत असल्याने शेतकरी हैराण आहेत. विनंती करूनही शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीत मुक्काम करण्याची वेळी आली आहे. शिवससंग्राम संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता सिनगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करून ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती.
या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे तुरीचे पीक चांगले आले आहे. बाजार समितीत तुरीला कमी भाव असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी नाफेडला दूर विक्र ी करत आहे.परतु खरेदी विक्र ी संघ व नाफेड यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे शेतकर्यांची तुर खरेदी करण्यास विलब होत आहे. अध्यक्ष राजेश इंगळे,तालुका संघटक जहीर खान पठाण, शिवा पुरंदरे, रामेश्वर जाधव, बालाजी खांडेभराड, देवांनद सानप, संभाजी नन्नवरे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)