१ मार्चपासून शेतकरी पुन्हा संपावर !; शेतकरी सुकाणू समितीच्या मेळाव्यात निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 03:22 PM2017-12-23T15:22:34+5:302017-12-23T15:23:11+5:30

सरसकट कर्जमाफी व हमीभाव यासाठी येत्या १ मार्चपासून महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत. शेतकरी सुकाणू समितीच्या आज सुभेदारी गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुपारी रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमंत मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कालिदास आपेट यांनी हा निर्णय जाहीर केला.

Farmers to strike again from March 1; Decision in the meeting of Farmer Steering Committee | १ मार्चपासून शेतकरी पुन्हा संपावर !; शेतकरी सुकाणू समितीच्या मेळाव्यात निर्णय

१ मार्चपासून शेतकरी पुन्हा संपावर !; शेतकरी सुकाणू समितीच्या मेळाव्यात निर्णय

googlenewsNext

औरंगाबाद : सरसकट कर्जमाफी व हमीभाव यासाठी येत्या १ मार्चपासून महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत. शेतकरी सुकाणू समितीच्या आज सुभेदारी गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुपारी रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमंत मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कालिदास आपेट यांनी हा निर्णय जाहीर केला. 

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर येत्या १६ व १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुकाणू समितीचे शिष्टमंडळ चर्चाकरील. त्यानंतर १ मार्चपासून सुरू होणार्‍या संपाच्या तयारीसाठी सुकाणू समितीचा महाराष्ट्र दौरा सुरू होईल. दुपारी मेळाव्यात सुकाणू समितीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. कालिदास आपेट यांनी प्रास्ताविकात पुढील आंदोलनाची व कृती कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली. कॉ. नामदेव गावडे, प्रतिभा शिंदे, किशोर ढमाले, गणेशकाका जगताप, करण गायकर आदींची या मेळाव्यात घणाघाती भाषणे झाली. 

हा नागनाथ व तो सापनाथ
प्रतिभा शिंदे यांनी आरोप केला की, भाजप- सेनावाले नागनाथ, तर काँग्रेस- राष्ट्रवादीवाले सापनाथ आहेत. हे दोघेही परवडणारे नाहीत. त्यासाठी आता आपल्याला महाराष्ट्रात एक समर्थ पर्याय उभा करायचा आहे. कारण सरकार पेरण्याची ताकद जशी शेतकर्‍यांमध्ये आहे तशीच कापण्याची ताकदही त्याच्यात आहे. सध्याच्या सरकारला शेतकरी- शेतमजुरांबद्दल काहीही प्रेम नाही. त्यांच्याशी सरकारला काहीही देणे-घेणे नाही. 

सदाभाऊ खोत यांच्यावरही प्रतिभा शिंदे यांनी टीकेची झोड उठवली. ‘नाव स्वाभिमानी आणि धंदा बेइमानी’ असे हे सदाभाऊ खोत. ते कधीच शेतकर्‍यांचे नव्हते.  अनिल पालोदे, संजय घाटनेकर, कॉ. भगवान भोजने, सचिन धांडे, बन्सी सातपुते आदींचीही मेळाव्यास उपस्थिती होती. 

खर्‍या अर्थाने तुम्ही नीचच
नीच म्हटले असे मानून बाईसारखे रडत व त्याचे भांडवल करीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातची सत्ता मिळवली; पण खरे सांगायचे तर हे भाजपवाले नीचच आहेत, असा हल्लाबोल छावा वीर क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केला. १ मार्चपासून सुरू होणार्‍या शेतकर्‍यांच्या संपात नाशिक जिल्हा ऐतिहासिक भूमिका पार पाडेल, अशी ग्वाही दिली. ‘कर्ज न घेणार्‍या एका आमदाराची कर्जमाफी झाली. हे स्वत: त्या आमदारानेच सांगितले. वारे डिजिटल इंडिया’अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

जाब विचारण्यासाठी
मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना भावही कमी मिळतोय. याचा जाब विचारण्यासाठी रघुनाथदादा पाटीलांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समितीचे सदस्य व उपस्थित शेतकरी क्रांतीचौकातील साखर सहसंचालकांच्या कार्यालयाकडे रवाना झाले.

Web Title: Farmers to strike again from March 1; Decision in the meeting of Farmer Steering Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.