कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 04:56 PM2017-07-11T16:56:28+5:302017-07-11T16:56:28+5:30
धर्माबाद येथील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यासाठी 10 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा परिणाम तालुका कृषी कार्यालयालायावर झाला आहे.
ऑनलाईन लोकमत
नांदेड : धर्माबाद येथील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यासाठी 10 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा परिणाम तालुका कृषी कार्यालयालायावर झाला आहे. पतंप्रधान पिक विमा योजनासारख्या विविध योजनांची मुदतीत पूर्तता अशी होणार या चिंतेने शेतरी मात्र त्रस्त झाले आहेत .
शासनाने 31 मे 2017 ला नविन मृद व जलसंधारण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्याने निर्माण केलेल्या खात्यामध्ये कृषी विभागातील कृषी सहाय्यकाची सर्वच पदे कायमचे बंद करून कृषी पर्यवेक्षक म्हणून मृद व जलसंधारण खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 2042 कृषी सहाय्यकाचे पदे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे कृषी विभाग पुर्णत:रिकामा होत आहे. एवढी मोठी पदे रिक्त झाल्यामुळे कृषी विभागाचा आकृतीबंध कसा राहिल याबाबत शासन स्तरावर काहीच हालचाली नाहीत.
सुधारित आकृतीबंध व इतर प्रलंबीत मागणीसाठी तालुक्यातील कृषी सहाय्यकांनी 10 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. आता याचा परिणाम जाणवत असून जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, मग्रारोहयो, प्रधानमंञी कृषी सिचांई व इतर सर्व योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. विविध योजनांची पुर्ण झालेल्या कामाची देयके रखडली जात असुन शेतकरी हेलपाटे मारत आहे. सध्या पिक विमा शेतकरी भरत असून काम बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.