शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Published: April 29, 2017 12:42 AM2017-04-29T00:42:01+5:302017-04-29T00:42:54+5:30
लातूर : तालुक्यातील गंगापूर येथे शंकरअप्पा आप्पाराव ढगे-कानडे (६२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.
लातूर : तालुक्यातील गंगापूर येथे शंकरअप्पा आप्पाराव ढगे-कानडे (६२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगा शिवराम ढगे यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लातूर तालुक्यातील गंगापूर तालुक्यातील शंकरअप्पा आप्पाराव ढगे-कानडे हे गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या आणि खासगी सावकाराच्या कर्जबाजारीपणामुळे अस्वस्थ होते. अलिकडे बँक आणि खासगी सावकाराचा कर्ज वसुलीसाठी वाढलेला तगाद्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. दरम्यान, त्यांनी शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील खुल्या जागेतील खांबाला गळफास घेवून आत्महत्या केली.
या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगा शिवदास ढगे यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतकरी शंकरअप्पा ढगे यांना गंगापूर शिवारात अल्प शेती आहे. या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान, या शेतीसाठी त्यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.