शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकार बेफिकिर

By Admin | Published: August 11, 2014 12:01 AM2014-08-11T00:01:46+5:302014-08-11T00:04:21+5:30

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.

Farmers suicides; The state government is uncomfortable | शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकार बेफिकिर

शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकार बेफिकिर

googlenewsNext

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.
परतूर येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या बैलगाडीसह मोर्चास ते संबोधित करत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने परतूर विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासाठी बैलगाडीसह शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बबनराव लोणीकर, भाजयूमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे, विजयराव गव्हाणे, जि. प. चे उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भाऊसाहेब कदम, हरीराम माने, सतीश जाधव हे प्रमुख उपस्थित होते.
तावडे पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळी परीस्थिती असताना राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही, सरकारजवळ दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलीही ठोस योजना नाही. गारपीट झाली, पिके हातची गेली, जे पिकवलं ते उगवलंच नाही. या राज्य सरकारने महाराष्ट्रावर तीन लाख कोटीचे कर्ज करून ठेवले. फुले, शाहू,आंबेडकर यांचा महाराष्टृ या सरकारने विक्रीला काढला आहे. राज्याची स्थिती वाईट आहे. राज्यात आमचे भाजपा सेना युतीचे सरकार आले तर सर्व आरक्षणाचे प्रश्न सोडवून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांना जेल दाखवू असा इशाराही तावडे यांनी यावेळी दिला. यावेळी आपल्या प्रास्ताविकात माजी आ. लोणीकर यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर खरमरीत टीका करून मतदारसंघातील प्रश्न मांडले. यावेळी जि. प. सदस्य शहाजी राक्षे, भगवानराव मोरे, बालाजी सांगूळे, मेहराज खतिब, प्रशांत बोनगे, उमाकांत मानवतकर, सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Farmers suicides; The state government is uncomfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.