शेतकऱ्यांच्या भारत बंदला सातारा-देवळाईत पाठिंबा
By | Published: December 9, 2020 04:00 AM2020-12-09T04:00:08+5:302020-12-09T04:00:08+5:30
शेतकरी विरोधी असलेले बिल केंद्र शासनाने मागे घ्यावे, यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शहरातील विविध ठिकाणी व्यवहार बंद ठेवून ...
शेतकरी विरोधी असलेले बिल केंद्र शासनाने मागे घ्यावे, यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शहरातील विविध ठिकाणी व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दर्शविला आहे.
बीड बायपास, देवळाई, नाईकनगर, माऊलीनगर, देवळाई रोड परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
तरीही हरिभाऊ राठोड व काँग्रेस कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्ते लोकांना विनंती करून बंद करण्याचे आवाहन करत होते.
हरिभाऊ राठोड, हकीम भाई, वशिमभाई, राहुल संत, अविनाश वारकरी, दुर्गेश कुलकर्णी, हेमलता हरिभाऊ हिवाळे, नदीमभाई, संतोष जोगदंड आदींची यावेळी उपस्थिती होती.
सातारा बंद,...
सातारा आमदार रोड येथेही कडकडीत बंद पाळून जय किसानचा नारा देण्यात आला.
शेतकरी सोमिनाथ शिराणे, महाविकास आघाडीचे रमेश बाहुले, रंजित ढेपे, नीलेश भाग्यवंत, प्रशांत सातपुते, रवी ढगे, बाबा रोठे, संभाजी अमृतेंसह सातारा परिसरातील शेतकरी यात सहभागी झाले होते.