एक लाखामागे साडेचारशे शेतकरी तणावग्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:54 AM2017-09-15T00:54:04+5:302017-09-15T00:54:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात १ लाख ६ हजार ९५३ शेतकºयांपैकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात १ लाख ६ हजार ९५३ शेतकºयांपैकी ४३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे, तर २३४ शेतकºयांना नैराश्याने ग्रासले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या पाच महिन्यातील सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.
शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागाच्या १४ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रेरणा प्रकल्प जाहीर केला आहे. याची माहिती देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविलेली आहे. शासन निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांतर्गत जानेवारी २०१६ पासून हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कासवगतीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात सद्य:स्थितीत उत्कृष्ट सेवा बजावणे सुरू केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, डॉ. सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोहंमद मुजाहेद, समुपदेशक अशोक मते, परिचारिका शीतल टाक, प्रियंका भोंडवे, लेखापाल महेश कदम हे या प्रकल्पांतर्गत शेतकºयांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येस परावृत्त करीत आहेत.