शेतक-यांची जिल्हा बँकेवर दगडफेक, पोलिसांचा लाठीमार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 05:11 PM2017-07-27T17:11:32+5:302017-07-27T17:19:16+5:30

इतर बँकेचा बोजा असलेल्या सातबारवरही पिक विमा भरून घ्यावा अशी शेत-यांची मागणी आहे.हि मागणी मान्य होत नसल्याने शेवटी संतप्त शेत-यांनी बँकेवर दगडफेक केली.

farmers throws stones on bank | शेतक-यांची जिल्हा बँकेवर दगडफेक, पोलिसांचा लाठीमार 

शेतक-यांची जिल्हा बँकेवर दगडफेक, पोलिसांचा लाठीमार 

googlenewsNext
ठळक मुद्देशेतक-यांनी दुपारी एक वाजता परभणी-जिंतूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. इतर बँकेचा बोजा असलेल्या सातबारवरही पिक विमा भरून घ्यावा अशी शेत-यांची मागणी आहे.मागणी मान्य होत नसल्याने शेवटी संतप्त शेत-यांनी बँकेवर दगडफेक केली.यामुळे पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर  लाठीचार्जे केला व परिस्थिती नियंत्रणात आणली.

ऑनलाईन लोकमत 

परभणी : बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पिक विमा भरून घेत नसल्यामुळे  संतप्त झालेल्या शेतक-यांनी दुपारी एक वाजता परभणी-जिंतूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. इतर बँकेचा बोजा असलेल्या सातबारवरही पिक विमा भरून घ्यावा अशी शेत-यांची मागणी आहे.हि मागणी मान्य होत नसल्याने शेवटी संतप्त शेत-यांनी बँकेवर दगडफेक केली.

यावेळी पोलिसांनी केलेल्या बँक अधिका-यां सोबत केलेल्या शिष्टाई नंतर हि आंदोलक शेतक-यांचे समाधान न झाल्याने त्यांनी बँकेवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर  लाठीचार्जे केला व परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे, बोरीचे स.पो.नि गजेंद्र सरोदे यांच्यासह बामणी, चारठाना, जिंतूर,  बोरी येथील पोलीस स्थानकातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच राज्य राखीव दलाच्या  तुकडीसही यावेळी पाचारण करण्यात आले होते. 

शासन आदेश नाहीत 
इतर बँकेचा बोजा असलेल्या सातबारा वर पीक विमा भरून घ्यावा अशी  आंदोलकांची मागणी आहे. परंतु , इतर बँकेचा बोजा असलेल्या सातबारावर पिक विमा भरून घेण्याबाबत अद्याप शासन आदेश आले नाहीत - आर. वि. सरोदे, शाखा अधिकारी.

Web Title: farmers throws stones on bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.