शेतकऱ्यांना खरेदी करावे लागणार कपाशीचे महागडे बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:05 AM2021-05-14T04:05:36+5:302021-05-14T04:05:36+5:30
सोयगाव : शासनाच्या महाडीबीटी योजनेच्या पोर्टलमधून कपाशीच्या बियाण्यांना वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणारे ...
सोयगाव : शासनाच्या महाडीबीटी योजनेच्या पोर्टलमधून कपाशीच्या बियाण्यांना वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणारे कपाशीचे बियाणे मिळणार नसल्याने स्पष्ट झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना महागडे बियाणे खरेदी करावे लागणार आहेत.
खरिपाच्या पेरण्यांसाठी यंदा महाडीबीटी या योजनेत एक अर्ज अनेक योजनेसाठी लागू केला आहे. बियाणे खरेदीसाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु या पोर्टलमध्ये बियाणे या घटकावर क्लिक केल्यावर मात्र कपाशी बियाणाचा उल्लेखच नसल्याचे समोर आले.
लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेत सोयाबीन, तांदूळ, तूर, मुग, उडीद, मका, बाजरी या बियाण्यांचा पोर्टलवर समावेश आहे. परंतु कपाशी बियाण्यांचा समावेश नसल्याने या योजनेतून कपाशी बियाणांना वगळण्यात आले असल्याने यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना महागडी कपाशी बियाणे खरेदी करावी लागणार आहे.