निवडणुकीमुळे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा
By | Published: November 28, 2020 04:17 AM2020-11-28T04:17:10+5:302020-11-28T04:17:10+5:30
सोयगाव : शासनातर्फे अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्तांना दिवाळीअगोदर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ती हवेतच विरली. आता पुन्हा ...
सोयगाव : शासनातर्फे अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्तांना दिवाळीअगोदर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ती हवेतच विरली. आता पुन्हा पदवीधर मतदारसंघ निवडणुका आणि सलग चार दिवस सुट्ट्या यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी आणखी चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महसूल विभागाने सोयगाव तालुक्यात ६५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम वर्ग करण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, बँकांनी तातडीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे अनुदानाचा १७ लाख ९३ हजार रुपयांचा धनादेश बँकेत अडकला आहे. त्यातच चार दिवस सुट्ट्या आणि पदवीधर निवडणुकांचे मतदान यामुळे शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना २ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महसूल विभागाने पिकांच्या नुकसानीसाठी ६५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने रक्कम वर्ग करण्याचे काम केले. मात्र,धनादेश बँकेत अडकल्याने विविध बँकेच्या शाखांमध्ये ही रक्कम अद्यापही वळती झालेली नव्हती.