आष्टी येथे शेतकऱ्यांनी केले बँकेचे कामकाज ठप्प
By Admin | Published: July 8, 2016 12:11 AM2016-07-08T00:11:30+5:302016-07-08T00:28:38+5:30
आष्टी : पीकविमा वाटपास प्रथम याद्या लाऊन वाटप करण्याच्या मागणीसाठी अगोदर वरून की खालून वाटप यासाठी शेतकरी अडून बसल्याने गुरुवारी येथील
आष्टी : पीकविमा वाटपास प्रथम याद्या लाऊन वाटप करण्याच्या मागणीसाठी अगोदर वरून की खालून वाटप यासाठी शेतकरी अडून बसल्याने गुरुवारी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखेचे कामकाज शेतकऱ्यांनी बंद पाडल्याने दिवसभर बँकेच्या व्यवहार ठप्प झाले होते. आष्टीसह परिसरातील अकोली, लिखित पिंप्री, ब्रह्मणवाडी, रामगव्हाण, पळशी, फुलवाडी, आनंदगाव, ढोकमाळतांडा, कणकवाडी तांडा, लोणी, सोपारा, वाहेगाव, आसनगाव, ढोणवाडी, कोकाटे हदगाव, पांडपोखरी, परटवाडी, हास्तूर आदींसह १८ गावातील शेतकऱ्यांनी २०१५ साली खरीप हंगामातील पीक विम्यापोटी शाखेस १३ कोटी ७० लाख रुपये प्राप्त झाले असून, त्यासाठी १० हजार लाभार्थी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोणत्या गावापासून प्रथम वाटप सुरू करायची हा घोळ सुरू असल्याने वाद होत आहेत. अंकलिपीनुसार शाखेने खालच्या वाय अक्षराच्या गावाच्या याद्या दोन दिवसांपूर्वी लावल्या होत्या. मात्र, वरील ए अक्षराच्या गावातील शेतकऱ्यांनी वाद घालत प्रथम झेडपासून सुरूवात न करता ए पासून सुरूवात करण्याची मागणी केली. या वादात आजही दिवसभर शाखेचे कामकाज बंद होते. (वार्ताहर)याबाबत शाखाधिकारी बी.बी. खंडागळे यांनी शाखेस वरिष्ठांकडून आलेले पत्र दाखवून झेडपासूनच वाटप सुरू होणार असल्याचे सांगितले. तरी दिवसभर कामकाज ठप्प होते. अखेर याबाबत शाखाधिकारी खंडागळे यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण सर्व सोसायटीच्या संचालकांची बैठक घेऊन वरिष्ठांनी दिलेले पत्र दाखविले व उद्यापासून शेवटच्या झेड अक्षरापासून वीमा वाटप होईल, असे सांगितले.