शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त
By Admin | Published: May 14, 2014 11:48 PM2014-05-14T23:48:29+5:302014-05-14T23:56:52+5:30
निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़
निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़ परंतु अशातच शेतीमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ निवघा बा़ परिसरातील शेतकर्यांनी सोयाबीन पीक आल्याबरोबरच रबी हंगामातील हरभरा पिकाच्या लागवडीकरिता व खर्च करीत आहे त्या भावात विकले़ अन् हरभरा पेरणी केली़ त्याचबरोबर कापूस आला तसा बाजारपेठेत विकला़ शेतकर्यांची भिस्त हरभरा पिकावरच होती़ ज्यावेळेस हरभरा काढला तेव्हा २६०० रुपये भाव होता़ तर शासनाचा हमीभाव ३१०० रुपये आहे़ आज जर हरभरा विकला तर बी-बियाणे घेण्यासाठी पैसा राहणार नाही, म्हणून शेतकर्यांनी हरभरा तसाच ठेवला होता़ परंतु आता विक्रीस काढला तेव्हा मात्र बाजारपेठेत २२०० रुपये भावात द्यावे लागत आहे़ तर अवकाळी पावसाने कापसाचा हंगाम लांबला तर काहींनी कापसाला पाणी देवून पुन्हा उत्पन्न काढले़ सुरुवातीस कापूस ५३०० रुपये विकला, आता मात्र ४ हजार रुपये विकत आहे़ निवघा बाजारपेठेत कापूस ३८०० ते ४०००, हरभरा १८०० ते २२००, सोयाबीन ३८०० ते४०००, तूर ३५०० ते ३८०० भाव मिळत आहे़ ऐन बी-बियाणे खरेदीच्या वेळेत शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ (वार्ताहर)