नदीपात्रात चप्पूवर ट्रॅक्टर टाकून शेतीची मशागतीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:05 AM2021-02-13T04:05:51+5:302021-02-13T04:05:51+5:30
गुरुवारी नदीपात्रात थर्माकॉलच्या चप्पूवर ट्रॅक्टर टाकून या भागातील मयूर वाघ, बाबासाहेब सुखधान, प्रवीण बोकडिया, इम्रान शेख आदी शेतकऱ्यांनी अडचणीतून ...
गुरुवारी नदीपात्रात थर्माकॉलच्या चप्पूवर ट्रॅक्टर टाकून या भागातील मयूर
वाघ, बाबासाहेब सुखधान, प्रवीण बोकडिया, इम्रान शेख आदी शेतकऱ्यांनी अडचणीतून मार्ग काढत पाण्यातून मार्गक्रमण करीत नेले.
या अनोख्या प्रयोगातून समयसूचकता आणि हिमतीच्या जोरावर शेतकरी काहीही करू शकतात, याचा प्रत्यय आला.
गोदाकाठच्या धनगरपट्टीजवळील त्र्यंबलपूर शिवारात नदीचे पाणी आता ओसरत आहे. माथा असलेल्या भागातील पात्र रिकामे झाल्याने येथे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जमिनींची मशागतीची तयारी सुरू केली आहे. काही भाग उंच आणि काही भाग उतारावर असल्याने अद्यापही काही भागात नदीचे पाणी आहे. त्यामुळे अशा भागात मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
----
कायगाव : नदीपात्रात चप्पूवर ट्रॅक्टर टाकून शेतीची मशागत केली जात आहे.