नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 06:45 AM2023-11-04T06:45:51+5:302023-11-04T06:46:10+5:30
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात १७ दिवस उपोषण केल्यानंतर सव्वा महिन्यातच सलग ९ दिवस दुसरे उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे गुरुवारी रात्री त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांना उलट्याही झाल्या. आता त्यांना ठणठणीत होण्यासाठी दिवाळीपर्यंत दहा ते बारा दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले. यात काही दिवस त्यांनी पाणीही न प्यायल्यामुळे प्रकृती खालावली.
डॉक्टर म्हणाले....
nडॉ. अभिमन्यू माकणे यांनी सांगितले की, जरांगे-पाटील यांनी त्यांच्या सप्टेंबरमधील उपोषणानंतर आराम न करता राज्यभर दौरे आणि सभा घेतल्या.
nयानंतर सलग दुसरे उपोषण केल्याने त्यांचे १२ किलो वजन घटले. पाणी न प्यायल्यामुळे त्यांच्या शरीरातील स्नायूही आकुंचन पावत होते. शुक्रवारी दुपारी त्यांना उलट्यांचा त्रास झाला.
nत्यांना पूर्णपणे ठणठणीत होण्यासाठी पुढील दहा ते बारा दिवस रुग्णालयात राहावे लागेल.