अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:06 AM2021-07-31T04:06:11+5:302021-07-31T04:06:11+5:30
संवदगाव येथील निवृत्ती सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतातून नियमबाह्यरित्या रस्ता करून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढावे, अशी त्यांची ...
संवदगाव येथील निवृत्ती सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतातून नियमबाह्यरित्या रस्ता करून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढावे, अशी त्यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. आलापूरवाडी येथील मच्छिंद्र दिवे या शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ता मिळावा यासाठी ते तहसील व उपजिल्हाधिकारी कार्यालयात अनेक दिवसांपासून चकरा मारत आहेत. साकेगाव येथील लक्ष्मीबाई व अप्पासाहेब आव्हाळे यांची नावे तलाठ्याने सातबारावरून कमी केले आहे. तसेच घायगाव येथील शेतकरी राजेंद्र धने यांच्या नावावरील ३० गुंठे जमीन साताबारावरून कमी झाली आहे. जमीन नावावर करून देण्यासाठी ते महसूल अधिकाऱ्याकडे हेलपाटे मारत आहेत. याशिवाय, कनकसागर येथील फुलचंद शिंदे या शेतकऱ्याने न्यायालयातून एका फेरला स्थगिती मिळवली. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमान करीत फेर घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रकरणांत कारवाई करण्यास तहसीलदार व उपजिल्हाधिकारी हे टाळाटाळ करत आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करून उपोषण केले. आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
फोटोसह
300721\img-20210726-wa0027.jpg
वैजापूर तालुक्यातील चार गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण