रमाई घरकुल योजनेसाठी समाज कल्याणसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:05 AM2021-01-13T04:05:16+5:302021-01-13T04:05:16+5:30
अनेक वर्षांपासून गोरगरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कित्येक वर्षांपासून माती व पत्र्याच्या घरात आपले जीवन जगत आहेत. ...
अनेक वर्षांपासून गोरगरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कित्येक वर्षांपासून माती व पत्र्याच्या घरात आपले जीवन जगत आहेत. बिकट परिस्थितीमुळे जे स्वतः घर बांधू शकत नाहीत, गोरगरीब घरकुल लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी रमाई आवास योजनेतून २० कोटी रुपये निधी औरंगाबाद शहराला मिळावा, याकरिता निवेदन दिले होते, परंतु, त्यानंतर कुठलीही कारवाई झालेली नाही. म्हणून पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्यासह घरकुल लाभार्थींनी दिनांक ११ जानेवारीपासून कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी उपोषणकर्ते लक्ष्मण कांबळे, जिल्हा अध्यक्ष, शेषराव सातपुते, राजू जाधव, रामदास लोखंडे, प्रकाश जाधव, सुनीता काळे, शेषराव सातपुते, राहुल पडघन, कडुबा जाधव आदींनी केली आहे.