कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपीचे कारागृहात उपोषण
By Admin | Published: March 27, 2017 11:58 PM2017-03-27T23:58:12+5:302017-03-28T00:00:05+5:30
लातूर : कल्पना गिरी खून खटल्यातील आरोपीने आपल्या नार्को टेस्टसह विविध चाचण्या करण्यात याव्यात, या मागणीसाठी लातूर जिल्हा कारागृहात उपोषण सुरू केले आहे.
लातूर : कल्पना गिरी खून खटल्यातील आरोपीने आपल्या नार्को टेस्टसह विविध चाचण्या करण्यात याव्यात, या मागणीसाठी लातूर जिल्हा कारागृहात उपोषण सुरू केले आहे. आपल्या नार्को टेस्टला परवानगी देण्यात यावी, यासाठी १३ जुलै २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात अर्जही सादर केला होता. या अर्जावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.
कल्पना गिरी खून खटल्यात आरोपी म्हणून महेंद्रसिंग विक्रमसिंग चौहान हा १२ एप्रिल २०१४ पासून जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८०/२०१४ कलम ३०२, ३७६, ३६४, ३५४, २०१, २२० (बी) व ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल आहे. घटनेपासून महेंद्रसिंग चौहान हा जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. सध्या या खटल्याचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. या गुन्ह्यातील अधिक माहिती उघड व्हावी, यासाठी आपली स्वखर्चाने नार्को, ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफ लाय डिटेक्टर आदी सर्व चाचण्या करण्यात याव्यात, अशा मागणीचा अर्ज महेंद्रसिंग चौहान याने १३ जुलै २०१६ रोजी न्यायालयात सादर केला होता. या अर्जावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने शनिवारपासून जिल्हा कारागृहात त्याने उपोषण सुरू केले आहे.