सिल्लोडमध्ये बस-पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, २७ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 08:19 PM2023-03-03T20:19:35+5:302023-03-03T20:20:06+5:30

या भीषण अपघातात बसचा चालक गंभीर जखमी आहे

Fatal bus-pickup accident in Chhatrapati Sambhajinagar; One died on the spot, 27 passengers injured | सिल्लोडमध्ये बस-पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, २७ प्रवासी जखमी

सिल्लोडमध्ये बस-पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, २७ प्रवासी जखमी

googlenewsNext

सिल्लोड: सिल्लोड -भराडी रस्त्यावर वांगी फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बस व गॅस वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात पिकअप चालक जागीच ठार झाला तर बसमधील २७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान झाला. बसचा चालक गंभीर जखमी आहे. तर २० प्रवाशांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

सुरेश सांडू गुंजाळ ( ४२ वर्ष रा.पिंपळगाव पेठ) असे मृत पिकअप चालकाचे नाव आहे. धडक ऐवढी जोरदार होती की बसमध्ये अडकलेले पिकअप वाहन जेसीबीच्या मदतीने वेगळे करण्यात आले. बसचा चालक मधुकर राजधर आमटे ( रा.देऊळगाव बाजार ) गंभीर जखमी असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवले आहे.

सिल्लोड पाचोरा ही बस सिल्लोड हुन पाचोरा ( बस क्रमांक एम एच १४ बी टी ४००६) कडे जात होती तर गॅस वाटप करून पिकअप भराडीहून रिकामे सिलेंडर घेऊन सिल्लोड कडे येत होता. दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहने समोरासमोर धडकली. रिकामे सिलेंडर रस्त्यावर पसरून वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर, नंदकिशोर सहारे, राजू गौर, राजेंद्र ठोंबरे, महंमद हनिफ, सुनील मिरकर, प्रवीण मिरकर, इरफान पठाण, शेख बबलू यांनी जखमींना मदत केली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मागतीने जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

धन्वंतरी असोसिएशन धावली मदतीला... 
उपजिल्हा रुग्णालयात डॉ.अनिरुद्ध गायकवाड, डॉ. राम मोहिते हे दोनच डॉक्टर हजर होते. यामुळे धन्वंतरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश मिरकर, डॉ. शेखर दोड, डॉ. लीना झलवार, डॉ. सोपान म्हस्के, डॉ. विनोद लोखंडे, डॉ. इब्राहिम, डॉ. शकील खान, डॉ. अभिलाष गोलेचा यांच्यासह इतर डॉक्टरांनी रुग्णालयात धाव घेत जखमींवर उपचार केले.


जखमींची नावे:
एकनाथ देवराव पाटील, महादू देवराव पाटील, वसंत पांडुरंग पाटील ( तिघे रा  नांदगाव ता सोयगाव), रामा लक्ष्मण दांडगे रा. घाटनांद्रा, शिफा आरेफखान रा. मुंबई, सुनंदा नारायण फोलाने रा.उपली, तुकाराम कडूबा सावळे रा.बोरमाळ तांडा, दादा विठोबा तायडे रा. आमठाणा, सुरेखा महेंद्र खरात रा.वरम जि. कल्याण, रजीया सिराज देशमुख रा.चारनेर, अलिमा आरेफखान रा. मुंबई, फकिरा कौतिक मोरे रा. घाटनांद्रा, पंडित बाबुराव शिंदे रा.जांभई, सुभद्रा गणेश गोरे रा.भराडी, शंकर जमनाजी मालोदे रा. घाटनांद्रा, गणेश नारायण गोरे रा.भराडी, चंद्रभान चिंतामण बनकर रा.धावडा, रुबिना उस्मान पठाण रा.कासोद, सुनीताबाई सोमनाथ बोंबले रा.धामणगाव, सरस्वतीबाई आनंदा फोलाने रा.उपळी,युवराज नारायण सरावडे  रा.देऊळगाव वाडी, कांचना अशोक फोलाने रा.उपळी, जिनत सिराज देशमुख रा.चारनेर, किसन उखडू शेळके रा. चारनेरवाडी, मोहमद अकिल पटेल रा.धामणी ता. कन्नड.

Web Title: Fatal bus-pickup accident in Chhatrapati Sambhajinagar; One died on the spot, 27 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.