कागजीपुरा येथील तलावाचे भाग्य उजाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:05 AM2021-07-19T04:05:21+5:302021-07-19T04:05:21+5:30
खुलताबाद : तालुक्यातील कागजीपुरा येथील तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. कॉस्मो फाऊंडेशनच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला असून नुकतेच ...
खुलताबाद : तालुक्यातील कागजीपुरा येथील तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. कॉस्मो फाऊंडेशनच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला असून नुकतेच सुशोभिकरणाच्या कामास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आगामी येथील तलावाकाठी पर्यटकांचा ओढा वाढणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
हस्तउद्योग व कागदाच्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले कागजीपुरा गाव. येथील व्यावसायिकांना तलावाचे पाणी उद्योगासाठी संजीवनी ठरत आहे. परंतु तलावाची सध्याची स्थिती पाहून कॉस्मो फाऊंडेशन व इनटॅक संस्थेच्या पुढाकाराने तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन कॉस्मो फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक हेमलता राजपूत, इनटॅकचे मुकुंद भोगले, कागजीपुराचे सरपंच शेख अहेमद शरीफोद्दीन, ग्रामसेवक व्ही. एम. आदमवाड, कॉस्मो फाउंडेशन क्लस्टर समन्वयक महेश बोरुडे व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
--------------
फोटो : कागजीपुरा येथील ऐतिहासिक तलाव सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना हेमलता राजपूत, मुकुंद भोगले, सरपंच शेख अहेमद, ग्रामसेवक व्ही. एम. आदमवाड, महेश बोरुडे.
180721\18_2_abd_50_18072021_1.jpg
कागजीपुरा येथील तलावाच्या सुशोभीकरणाचे कामास सुरूवात