नोटीस दिल्याने पितापुत्राचा संताप अनावर; इमारत निरीक्षकाला महापालिकेत शिवीगाळ करत केली धक्काबुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:56 PM2021-01-19T18:56:11+5:302021-01-19T18:57:32+5:30

Aurangabad Municipality : नोटीस दिल्याचा जाब विचारत केली मारहाण

Father and son angry over notice; The building inspector was insulted and pushed in Aurangabad Municipality | नोटीस दिल्याने पितापुत्राचा संताप अनावर; इमारत निरीक्षकाला महापालिकेत शिवीगाळ करत केली धक्काबुकी

नोटीस दिल्याने पितापुत्राचा संताप अनावर; इमारत निरीक्षकाला महापालिकेत शिवीगाळ करत केली धक्काबुकी

googlenewsNext

औरंगाबाद: कायदेशीर नोटीस दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पिता पुत्राने महापालिकेत जाऊन इमारत निरीक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास झाली. याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात पितापुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय राधाकृष्ण बसय्ये आणि स्वप्नील संजय बसय्ये (दोघे रा. बसय्येनगर)अशी आरोपीची नावे आहेत. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार सय्यद जमशीद सय्यद अजमेर (५२) हे महापालिकेचे इमारत निरीक्षक आहेत. आज सकाळी १० वाजेपासून महापालिकेच्या त्यांच्या कार्यालयात प्रशासकीय अधिकारी वसंत भोये,  आर .एस.रापतवार आणि नागरिक हासनोद्दीन  यांच्यासोबत कार्यालयीन चर्चा करीत होते. साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी पिता-पुत्र हातात कागदपत्रे घेऊन ते आले. यावेळी भोये यांना उद्देशून नोटीस का पाठवली असे म्हणाले. स्वप्निल याने जमशिद यांना पाहून तुम्हीच नोटीस दिली होती. कशाची नोटीस आहे असे त्यांना विचारले असता मालमत्तेच्या मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात ही नोटीस असल्याचे जमशिद यांनी त्यांना सांगितले. यावेळी स्वप्निल एकदम चवताळून त्यांना शिवीगाळ करू लागला. 

जमशिद यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांच्या खांद्याला पकडून जोरदार  धक्के देऊ लागला .एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने जमशिद यांना धक्काबुक्की केली. यावेळी झालेली आरडाओरड ऐकून दोन मजूर धावत आले. त्यांनी बसय्ये पिता-पुत्राला पकडले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी संजय आणि स्वप्नील बसय्ये यांना ताब्यात घेऊन सिटीचौक ठाण्यात नेले. याप्रकरणी सय्यद जमशीद यांनी आरोपीविरूध्द सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करुन धमकावल्याची फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 

Web Title: Father and son angry over notice; The building inspector was insulted and pushed in Aurangabad Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.