पिता-पुत्रांनी धाडसाने केली बिबट्याच्या जबड्यातून वासराची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:02 AM2021-08-29T04:02:17+5:302021-08-29T04:02:17+5:30

सोयगाव : बिबट्याने हल्ला चढवून जबड्यात पकडलेल्या वासराची पिता-पुत्रांनी धाडस करून बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. दैव बलवत्तर म्हणूनच या ...

The father and son bravely rescued the calf from the leopard's jaw | पिता-पुत्रांनी धाडसाने केली बिबट्याच्या जबड्यातून वासराची सुटका

पिता-पुत्रांनी धाडसाने केली बिबट्याच्या जबड्यातून वासराची सुटका

googlenewsNext

सोयगाव : बिबट्याने हल्ला चढवून जबड्यात पकडलेल्या वासराची पिता-पुत्रांनी धाडस करून बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. दैव बलवत्तर म्हणूनच या वासराचा पुनर्जन्मच झाला आहे. ही चित्तथरारक घटना सोयगाव तालुक्यातील सोनसवाडी शिवारात शनिवारी दुपारी घडली. शांताराम वाकडे व त्यांची दोन मुले गणेश व सुरेंद्र वाकडे या पिता-पुत्रांच्या धाडसाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सोनसवाडी शिवारातील गट क्रमांक ११ मध्ये चरत असलेल्या सुमारे तीन वर्षीय वासरावर बिबट्याने हल्ला चढवून जबड्यात पकडून त्याला उचलून घेऊन निघाला. हा प्रसंग शेतात काम करीत असलेले शेतकरी शांताराम वाकडे, गणेश वाकडे आणि सुरेंद्र वाकडे यांच्या नजरेस पडला. तेव्हा घाबरून न जाता त्यांनी मोठ्या हिमतीने बिबट्याचा सामना केला. सापळा रचीत लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने व आरडाओरड करीत बिबट्याला हुसकावून लावले. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने जबड्यातील वासराला घट्ट पकडून ठेवले होते. शेतावर असलेल्या पाळीव कुत्र्याने बिबट्याकडे धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने जबड्यात पकडलेल्या वासराला खाली सोडले. तर कुत्र्यालादेखील पंजा मारल्याने कुत्रेदेखील जखमी झाले. तेव्हा शेतकऱ्यांचा आवाज सुरूच होता. त्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी झालेल्या वासराने मालकाकडे धाव घेतली. बिबट्याच्या जबड्यातून वासराला सुरक्षित बाहेर काढण्यात पिता-पुत्रांना यश आले.

-----

वनविभागाला नाही दिली माहिती

सोनसवाडी शिवारात बिबट्याचा वावर असून बिबट्याने वासरावर हल्ला चढविला. पिता-पुत्रांनी केलेल्या धाडसामुळे त्याचे प्राण वाचले. परंतु येथे असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करणे गरजेचे आहे. तरीदेखील वाकडे कुटुंबीयांनी ही माहिती वनविभागाकडे दिली नाही. वनअधिकाऱ्यांच्या चौकशीच्या भानगडीत त्यांना पडायचे नसल्याचे शांताराम वाकडे यांनी सांगितले.

-----

छाया ओळ : सोयगाव-सोनसवाडी शिवारातील बिबट्याच्या जबड्यातून वाचविलेले वासरू.

280821\img-20210828-wa0116.jpg

सोयगाव-बिबट्याच्या जबड्यातून गंभीर झालेले वासरू

Web Title: The father and son bravely rescued the calf from the leopard's jaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.