बाप-लेकाने तहसीलदारांच्या टेबलावर आपटले डोके; शेतीच्या वादावर मिळतेय ‘तारीख पे तारीख’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 06:55 PM2018-09-19T18:55:27+5:302018-09-19T18:57:20+5:30

वारंवार तारखा करून कंटाळलेल्या बाप-लेकाने चक्क तहसीलदारांच्याच टेबलावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Father and son cracks on tehsildar's table; 'Date to date' on agriculture issue | बाप-लेकाने तहसीलदारांच्या टेबलावर आपटले डोके; शेतीच्या वादावर मिळतेय ‘तारीख पे तारीख’ 

बाप-लेकाने तहसीलदारांच्या टेबलावर आपटले डोके; शेतीच्या वादावर मिळतेय ‘तारीख पे तारीख’ 

googlenewsNext

गंगापूर (औरंगाबाद ) : शेतातील रस्त्याच्या वादावरून २ वर्षांपासून तक्रार करूनही न्याय मिळत नाही, तसेच वारंवार तारखा करून कंटाळलेल्या बाप-लेकाने चक्क तहसीलदारांच्याच टेबलावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांनी या बाप-लेकाला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील तहसील कार्यालयात घडल्याने खळबळ उडाली.

तहसील कार्यालयामध्ये १८ सप्टेंबर रोजी दुपारी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तहसीलदार डॉ. अरुण ज-हाड यांच्या न्यायालयासमोर तारखा चालू होत्या. यामध्ये तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील शेतकरी सीताराम धनाड व त्यांचा मुलगा दत्तात्रय धनाड यांनी २०१६ मध्ये त्यांचे भाऊबंद शेतात जाऊ देत नसल्याने त्यांच्या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार दिली होती. मात्र, दोन वर्षे नुसत्या तारखा मिळत असल्याने धनाड पिता-पुत्र हैराण झाले होते.

मंगळवारी त्यांची तारीख होती. वादी-प्रतिवादी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात तहसीलदारांसमक्ष रस्त्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. दरम्यान, तहसीलदार आपल्या चेम्बरमध्ये गेले, याचवेळी धनाड पिता-पुत्राने आम्हाला न्याय मिळत नाही, तर आमचा जगून काय फायदा, असे म्हणून तहसीलदारांच्या टेबलवरच डोके आपटायला सुरुवात केली. मात्र, उपस्थित लोकांनी त्यांना आवरले व तहसीलदारही तात्काळ बाहेर आले. काही दिवसांपूर्वीच मी येथील पदभार स्वीकारला आहे, आपल्याला जरूर न्याय मिळेल, अशी समजूत त्यांनी घातली व मी स्वत: स्थळपाहणी करून योग्य तो निर्णय देणार असल्याचे तहसीलदारांनी सांगून त्यांना पुढील तारीख दिली. यानंतर प्रकरण निवळले व उपस्थितांचाही जीव भांड्यात पडला.

Web Title: Father and son cracks on tehsildar's table; 'Date to date' on agriculture issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.