खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बाप-लेकास सश्रम कारावास व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:17 PM2019-04-16T23:17:33+5:302019-04-16T23:19:13+5:30
सुनेची छेड काढणाऱ्यावर शेख अय्युब शेख हिराजी आणि त्याचा मुलगा शेख आसिफ शेख अय्युब या दोघांनी तलवार आणि सुºयाने प्राणघातक हल्ला केला होता. त्या दोघांना सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी मंगळवारी (दि.१६ एप्रिल) ‘खुनाचा प्रयत्न केल्या’च्या आरोपाखाली प्रत्येकी ७ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : सुनेची छेड काढणाऱ्यावर शेख अय्युब शेख हिराजी आणि त्याचा मुलगा शेख आसिफ शेख अय्युब या दोघांनी तलवार आणि सुºयाने प्राणघातक हल्ला केला होता. त्या दोघांना सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी मंगळवारी (दि.१६ एप्रिल) ‘खुनाचा प्रयत्न केल्या’च्या आरोपाखाली प्रत्येकी ७ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.
निहाल जमील अहमद शेख (२०, रा. देवळाई) याने शेख अय्युब शेख हिराजी (४२) याच्या सुनेची छेड काढल्याचा आरोप करीत शेख अय्युब याच्यासह शेख आसिफ शेख अय्युब (२१), शेख अमीन शेख चाँद (२५), शेख चाँद शेख मदोद्दीन (५०) व शेख समीर शेख अय्युब (२५, सर्व रा. देवळाई परिसर) यांनी १४ आॅगस्ट २०१६ रोजी दुपारी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात शेख अय्युब, शेख आसिफ आणि शेख समीर यांनी फिर्यादी निहालच्या पोटावर तसेच छातीवर तलवार व सुºयाने गंभीर वार केले. शेख अमीन व शेख चाँद यांनी निहालला पकडून मारहाण केली. निहालला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निहाल जमीलच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०७, १०९, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, ३२३ अन्वये चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील शरद बांगर यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने शेख अय्युब शेख हिराजी व शेख आसिफ शेख अय्युब यांना भादंवि कलम ३०७ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला, तर शेख अमीन व शेख चाँद यांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. सहआरोपी शेख समीर शेख अय्युब हा अद्यापही फरार आहे.
चौकट
फिर्यादी निहाल जमील अहमद शेख याने ‘एनसीसी’चे ‘बी’ व ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त केले होते. तो सैन्यात भरती होण्याची तयारी करीत होता. मात्र, गंभीर हल्ल्यामुळे त्याला दीड महिना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. परिणामी, त्याच्या भवितव्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन दंडातील १० हजार रुपयांपैकी ७ हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.