घर पडणार या धास्तीने उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:21+5:302021-01-25T04:06:21+5:30
''टॅक्सी वे'' न झाल्यास ९०० घरे वाचतील विमानतळ धावपट्टीच्या रुंदीकरणासाठी आम्ही आमच्या शेतजमिनी देण्यास तयार आहोत. पण येथे ''टॅक्सी ...
''टॅक्सी वे'' न झाल्यास ९०० घरे वाचतील
विमानतळ धावपट्टीच्या रुंदीकरणासाठी आम्ही आमच्या शेतजमिनी देण्यास तयार आहोत. पण येथे ''टॅक्सी वे'' साठी जमीन घेतली जात आहे. विमान थांबण्यासाठी टॅक्सी वे चा वापर होतो. येथे दिवसभरात ४ विमाने येतात. राज्यात मुंबई विमानतळालाच टॅक्सी वे आहे. कारण, तेथे २०० पेक्षा अधिक विमाने दररोज ये - जा करतात. टॅक्सी वे येथे केले तर सुमारे दीड हजार घरे रुंदीकरणात पाडली जातील. पण टॅक्सी वे केला नाही व फक्त धावपट्टीचे रुंदीकरण केल्यास ९०० घरे वाचतील. केंद्राचा खर्चही वाचेल.
- बापूसाहेब दहीहंडे
जेष्ठ नागरिक, चिकलठाणा
---
समृद्धी महामार्गानुसार मोबदला द्या
आमचे गट नंबर ४०१ मध्ये १४ एकर जमीन आहे. त्यातील ९ एकर जमीन विमानतळ रुंदीकरणात चालली आहे. बाकीच्या जमिनीचे काय करायचे? विमानतळाच्या भिंतीलगत काहीच करता येत नाही. शिल्लक जमिनीला कमर्शियलचा दर्जा देण्यात यावा व आमच्या शेतजमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे पाच पटीने अधिक मोबदला देण्यात यावा.
- सुरेश जोशी
शेतकरी, चिकलठाणा