'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

By साहेबराव हिवराळे | Published: September 1, 2023 12:15 PM2023-09-01T12:15:27+5:302023-09-01T12:16:43+5:30

साप पकडण्याचे प्रशिक्षणच दिले नसल्याचे काही अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवितात.

'Fear snakes not leopards'; No one dares to catch a snake in the forest department | 'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :साप पकडणे वन विभागात कुणालाच जमत नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना भरती प्रसंगी साप पकडण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. परंतु, त्यांना याचा विसर पडलेला असावा किंवा नको ती जोखीम म्हणून टाळले जाते की काय, असा सवाल आहे. वन विभागाची वन्यजीव पकडताना किंवा साप समोर आला की धांदल उडत आहे. आरआरयू टीमला ही कामे करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतु, ती टीमही आता दिसत नाही. अधिकारी मात्र सांगतात की, ते पथक सक्रिय आहे. साप पकडण्याचे आम्हाला प्रशिक्षणच दिले नसल्याचे काही अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवितात.

सुरुवातीला प्रशिक्षण दिलेले
वन विभागात हे प्रशिक्षण वरिष्ठांना देण्यात आलेले आहे. वन विभागात साप निघणे हे काही नवीन नाही. परंतु साप त्याच्या वाटेने जातो. त्याला छेडू नये, तो स्वरक्षणासाठीच दंश करतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘मीपण बरेच दिवस झाले, साप पकडलेला नाही,’ असेही त्यांनी सांगून टाकले.

साप दिसला की ‘तुफान भीती’
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, काय सांगू तुम्हाला? एक वेळेस बिबट्याची भीती वाटत नाही; परंतु सापाची प्रचंड भीती वाटते. सापाची चपळता आणि तो कधी दंश करील ही धास्ती वाटते. त्यामुळे आम्ही सरळ सर्पमित्रांनाच बोलावून त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यास सांगतो.

सर्पमित्रांकडून कामे; अनुदान व विमा नाही
अधिकारी सर्पमित्रांना बोलवितात. पण, त्यांना त्याचा मोबदला तर सोडाच; साधा विमादेखील काढत नाहीत. याबाबत वरिष्ठांनी बैठकीत निर्णय घेण्याची गरज आहे.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

Web Title: 'Fear snakes not leopards'; No one dares to catch a snake in the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.