माजलगांव- परभणी मार्गावर भिषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 05:32 PM2017-07-10T17:32:48+5:302017-07-10T17:34:13+5:30
सकाळी ११ वाजता त्यांच्या गाडीला माजलगाव- परभणी रस्त्यावरील कल्याणनगर येथे धनदीप एजन्सीजवळ भिषण अपघात झाला. यात किशनलाल मल (७५) हे जागीच ठार तर इतर तिघे गंभिर जखमी झाले.
ऑन लाईन लोकमत
बीड : परळी येथील कंत्राटदार किशनलाल मल हे आपल्या परिवारासह माजलगाव तालुक्यातील ढालेगांव येथे देवदर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान सकाळी ११ वाजता त्यांच्या गाडीला माजलगाव- परभणी रस्त्यावरील कल्याणनगर येथे धनदीप एजन्सीजवळ भिषण अपघात झाला. यात किशनलाल मल (७५) हे जागीच ठार तर इतर तिघे गंभिर जखमी झाले.
किशनलाल मल हे आपली पत्नी शकुंतलाबाई यांच्यासह ढालेगांव येथे देवदर्शनासाठी इनोव्हा गाडी क्र. एम.एच. ४४ जी. ३४१ मध्ये जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर कल्याण नगर येथे धनदिप एजन्सीजवळ समोर आलेल्या कुत्र्यास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका झाडावर आदळी, पुढे गाडीने दोन ते तीन पलटया खाल्या. यात किशनलाल मल हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी शकुंतलाबाई मल, संतोष देशमुख व चालक राम मुसांडे हे गंभिररित्या जखमी झाले.
दरम्यान, अपघात स्थळी कल्याणनगर , खरात आडगांव, पवारवाडी येथील तरुणांनी लागलीच मदत करुन उलटी पडलेली गाडी सरळ करुन जखमींना माजलगांव येथील ग्रामिण रुग्णालयात दाखला केले. यावेळी डॉक्टरानी त्यांच्यावर प्राथमीक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवले.