भरधाव ट्रॅक्टरची दोन पादचाऱ्यांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:19 PM2019-07-13T23:19:47+5:302019-07-13T23:20:03+5:30

भरधाव ट्रॅक्टरने दोन पादचाऱ्यांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

Fearing the tractor hit two pedestrians | भरधाव ट्रॅक्टरची दोन पादचाऱ्यांना धडक

भरधाव ट्रॅक्टरची दोन पादचाऱ्यांना धडक

googlenewsNext

वाळूज महानगर : भरधाव ट्रॅक्टरने दोन पादचाऱ्यांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टरचालकाने रस्त्यावरील एक रिक्षा, दुचाकी व मोबाईल शॉपीला धडक दिली. या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकास चोप दिला.


मंगेश गोविंद वाढवे (१८) हा शुक्रवारी रात्री पोट दुखत असल्यामुळे दोघांसह मेडिकलवर औषधी आणण्यासाठी जात होता. येथील पवननगररोडवर रात्री १० वाजेच्या सुमारास कमळापूरकडून भरधाव ट्रॅक्टरने (एम.एच.२१, डी.४३३९) धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. सुदैवाने इतर दोघे बचावले.

त्यानंतर ट्रॅक्टरचालकाने पादचारी माजी सैनिक अमृत झिने यांनाही धडक दिली. दोन पादचाºयांना धडक दिल्यानंतर ट्रक्टरने रिक्षा व दुचाकीला ठोकरत मोबाईल शॉपीच्या गेटला धडक दिली. मंगेश वाढवे याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात जखमी झालेले माजी सैनिक अमृत झिने यांच्यावर बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.


अपघातानंतर ट्रक्टर चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्याला बेदम चोप दिला. यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टरचालकास शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Fearing the tractor hit two pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.