सासरकडील जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:04 AM2020-12-31T04:04:56+5:302020-12-31T04:04:56+5:30

गंगापूर : महागडी दुचाकी घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ व सासरकडील इतर जाचाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने ...

Fed up with the persecution of her father-in-law, she ended her married life | सासरकडील जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

सासरकडील जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

googlenewsNext

गंगापूर : महागडी दुचाकी घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ व सासरकडील इतर जाचाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना गंगापूर तालुक्यातील पिंपरी येथे घडली. मंदाकिनी योगेश बाराहाते असे मयत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंगी येथील मंदाकिनी संजय तिखे यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी पिंपरी येथील योगेश निवृत्ती बाराहाते यांच्यासोबत झाला होता. सासरकडील मंडळींनी सुरुवातीचे काही दिवस मंदाकिनीला चांगली वागणूक दिली. मात्र, वर्षभरापासून महागडी दुचाकी घेण्यासाठी तुझ्या माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करीत पती योगेश, सासू मंगलबाई निवृत्ती बारहाते, सासरा निवृत्ती कचरू बारहाते यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. सारकडील मंडळीचा छळ विकोपाला गेल्यावर शेवटी २७ डिसेंबर रोजी मंदाकिनी यांनी नरहरी रांजणगाव शिवारातील शेतात असलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी विहिरीमध्ये गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी मयत मंदाकिनी यांचे वडील संजय तिखे (हल्ली मुक्काम मेंढी शिवा, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fed up with the persecution of her father-in-law, she ended her married life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.