सीजीओविषयी प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:02+5:302021-01-19T04:07:02+5:30
को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन या समितीमध्ये समाजातील विविध जातिधर्माच्या लोकांचा सहभाग असावा तसेच सामाजिक संस्था, व्यापारी संस्था, सीए- सीएस यांच्या संघटना, ...
को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन या समितीमध्ये समाजातील विविध जातिधर्माच्या लोकांचा सहभाग असावा तसेच सामाजिक संस्था, व्यापारी संस्था, सीए- सीएस यांच्या संघटना, वकिलांच्या संस्था, उद्योगांच्या संघटना व शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असावा. सर्वांच्या सहभागामुळे विकासाचा दृष्टिकोन व्यापक ठेवता येईल. सर्वांचा सहभाग आणि नियमित बैठका यातून नक्कीच शहराचा विकास होईल.
- लक्ष्मीकांत जयपूरकर
--------
२. प्रामाणिकपणे काम करावे
सातारा : देवळाईतील प्रश्नांसाठी खूप वर्षांपासून लढा सुरू आहे. पण प्रश्न मात्र अजूनही कायमच आहेत. त्यामुळे ज्या सामान्य लोकांना खरोखर नागरी समस्या माहिती आहेत, त्यांना आणि विविध क्षेत्रांतील लोकांना या समितीमध्ये घ्यावे. जेणेकरून समितीचे सदस्य कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकारण समोर न आणता समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील आणि त्यातूनच शहराचा विकास होऊ शकेल.
- ॲड. वैशाली कडू
--------
३. अनुभवी लोक असावेत
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहर विकासासाठी सामान्य नागरिक, विविध संघटना प्रतिनिधित्व करतील, अशा को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनची अपेक्षा व्यक्त केली आहे. यामध्ये समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग असावा, तसेच ही सर्व मंडळी अनुभवी असावीत. जेणेकरून प्रत्येकाच्या अनुभवाचा उपयोग विकासकामांसाठी होऊ शकतो.
- सीमा चौरसिया