‘खेलो इंडिया’तील सुवर्णपदकविजेत्या संघातील ज्योती, मयुरी यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:00 AM2018-02-15T01:00:49+5:302018-02-15T01:01:07+5:30
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकण्यात निर्णायक योगदान देणाºया औरंगाबादच्या धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांचा आज जल्लोषपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या दोन्ही खेळाडूंची धर्मवीर संभाजी विद्यालय, आविष्कार चौक, गुलमोहर कॉलनी, जिजामाता हायस्कूल या मार्गावर विजयी रॅली काढण्यात आली.
औरंगाबाद : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकण्यात निर्णायक योगदान देणाºया औरंगाबादच्या धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांचा आज जल्लोषपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या दोन्ही खेळाडूंची धर्मवीर संभाजी विद्यालय, आविष्कार चौक, गुलमोहर कॉलनी, जिजामाता हायस्कूल या मार्गावर विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर धर्मवीर संभाजी विद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या वतीने या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या रॅलीत ज्योती मुकाडे व मयुरी पवार यांच्यासोबत राष्ट्रीय व राज्यस्तीय पदकविजेत्या गायत्री भोसले, ऋतुजा सुरडकर, विनया राजपूत, प्रांजल सोनवणे, राजनंदिनी वाघमारे, मयुरी सोनेत, भारती मनगटे, अमृता माने, धनश्री पवार, कोमल बनसोडे, सीमा खान होत्या. सत्कार सोहळ्यास दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव श्यामसुंदर नाईक, मुख्याध्यापक अशोक मोरे, बाभूळगावकर, पर्यवेक्षक शिवदास गिरे, जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, उपाध्यक्ष डॉ. दीपक मसलेकर, सचिव गोविंद शर्मा, मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा शिक्षक विनायक राऊत, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. रॅली यशस्वी करण्यासाठी अविनाश शेंगुळे, अजय मालकर, विकास सूर्यवंशी, श्रीपाद लोहकरे, सागर बांदार, गणेश बोंडे आदींनी परिश्रम घेतले.