क्रीडा प्रबोधिनीतील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:55 AM2018-04-01T00:55:42+5:302018-04-01T00:56:00+5:30

राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा शनिवारी विभागीय क्रीडा संकुलात सत्कार करण्यात आला. हा सत्कार क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांच्या हस्ते करण्यात आला. क्रीडा मार्गदर्शकांत सुरेंद्र मोदी (अ‍ॅथलेटिक्स), पूनम नवगिरे (अ‍ॅथलेटिक्स), इम्रान शेख (हॉकी) यांचा सत्कार करण्यात आला.

Felicitations of National Players of Sports Academy | क्रीडा प्रबोधिनीतील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

क्रीडा प्रबोधिनीतील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

googlenewsNext

औरंगाबाद : राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा शनिवारी विभागीय क्रीडा संकुलात सत्कार करण्यात आला. हा सत्कार क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांच्या हस्ते करण्यात आला.
क्रीडा मार्गदर्शकांत सुरेंद्र मोदी (अ‍ॅथलेटिक्स), पूनम नवगिरे (अ‍ॅथलेटिक्स), इम्रान शेख (हॉकी) यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंमध्ये साक्षी चव्हाण, प्रतीक्षा सणस, संदीप पाडवी, पूनम काळेल, संचिता मोरे, सोनाजी पोटे, लक्ष्मण पावरा, वेदांत पिसाळ आणि राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकणाºया हॉकी संघांचा गौरव करण्यात आला. साक्षी चव्हाण हिने राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण व २ रौप्यपदके, तर राज्यस्तरीय स्पर्धेत ३ सुवर्ण, ३ रौप्यपदकांची लूट केली आहे. प्रतीक्षा सणस हिने ‘खेलो इंडिया’मध्ये १ रौप्य, राष्ट्रीय स्पर्धेत एक रौप्यपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे ती मोरक्को येथे होणाºया जागतिक निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. संदीप पाडवी याने राज्यस्तरीय स्पर्धेत एक रौप्यपदक जिंकले आहे. पूनम काळेल हिने राज्यस्तरीय स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्यपदक जिंकले आहे. तसेच राष्ट्रीय गेल इंडिया स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. सोनाजी पोटे याने राज्यस्तरीय स्पर्धेत एक रौप्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. लक्ष्मण पावरा याने राज्यस्तरीय स्पर्धेत २ रौप्यपदके जिंकली आहे. वेदांत पिसाळ याने राज्यस्तरीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. आज झालेल्या सत्कार सोहळ्यास क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांच्यासह क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, चंद्रकांत मखरे, सुनील वानखेडे, सोनल तायडे, सुरेश मोरे, गौतम कहाळे, हौसाबाई काकडे व सुभाष मुरकुंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Felicitations of National Players of Sports Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :