उपोषणार्थी घाटीतील महिला कर्मचारी सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:04 AM2021-06-06T04:04:16+5:302021-06-06T04:04:16+5:30
नंदा हिवराळे असे या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासह अन्य कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून घाटीतील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर ...
नंदा हिवराळे असे या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासह अन्य कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून घाटीतील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी नंदा हिवराळे यांची प्रकृती बिघडली. यावेळी माहिती मिळताच त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार करून सलाईन लावण्यात आली. यावेळी माहिती मिळताच रात्री उपोषणस्थळी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे अभय टाकसाळ आणि कंत्राटी कर्मचारी एकत्र आले. कर्मचाऱ्यांकडून घाटी प्रशासनाविषयी रोष व्यक्त करण्यात आला. याविषयी वैद्यकीय उपअधीक्षक डाॅ. विकास राठोड यांनी घाटीत धाव घेऊन कर्मचाऱ्यांची संवाद साधला. सदर महिला कर्मचाऱ्याला अधिक उपचारांसाठी अपघात विभागात दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे डाॅ. विकास राठोड यांनी सांगितले.
फोटो ओळ...
घाटीत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याची उपोषणस्थळी प्रकृती बिघडल्याने सलाईन लावण्यात आली.
उपोषणस्थळी जमा झालेले कंत्राटी कर्मचारी.