बारावीच्या परीक्षेत मुलींची भरारी
By Admin | Published: May 31, 2017 12:35 AM2017-05-31T00:35:15+5:302017-05-31T00:36:10+5:30
लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. लातूर विभागात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.२७ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३७ टक्के आहे.
लातूर विभागातील लातूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५७ मुले परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी १७ हजार ५४५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.४८ टक्के असून, १३ हजार ९२३ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी १२ हजार ९८४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. याचे प्रमाण ९३.२६ टक्के आहे. लातूर जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ५.७८ टक्के अधिक आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ९ हजार ८१६ मुले परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी ७ हजार ८१५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्याचे प्रमाण ७९.६१ टक्के आहे. तर ७ हजार १४० मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी ६ हजार ४८३ उत्तीर्ण झाल्या आहेत. याचे प्रमाण ९०.८० टक्के आहे.
नांदेड जिल्ह्यात १९ हजार ५२४ मुले परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी १६ हजार ७५९ उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.८४ टक्के असून १४ हजार ३० मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १२ हजार ९५० उत्तीर्ण झाल्या आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३० टक्के आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. हे यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे.