खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे पेरणी गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:04 AM2021-05-20T04:04:56+5:302021-05-20T04:04:56+5:30
करमाड : खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकऱ्यांचे पेरणी गणित कोलमडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ...
करमाड : खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकऱ्यांचे पेरणी गणित कोलमडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. फळ उत्पादक, भाजीपाला उत्पादक यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने खातांच्या किमतीत केलेली भरमसाठ वाढ मागे घ्यावी, अशी मागणी औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी शिष्टमंडळात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव शेळके, राजू घागरे, विठ्ठल शिंदे, बाबासाहेब मोकळे, बाबा वाघ आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनावर बबन कुंडारे, मनोज शेजुळ, विठ्ठल कोरडे, गजानन मते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - तहसीलदार ज्योती पवार यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष रामराव शेळके, राजू घागरे, विठ्ठल शिंदे, बाबासाहेब मोकळे आदी.